मुंबई, (प्रतिनिधी) ३० जुलै - स्मार्टफोन आणि वेअरेबल्स क्षेत्रातील अग्रेसर तंत्रज्ञान कंपनी सॅमसंग (Samsung) ने आपल्या प्रीमियम स्मार्टवॉच श्रेणीतील गॅलेक्सी वॉच अल्ट्रा २ (Galaxy Watch Ultra2) आणि गॅलेक्सी वॉच ९ (Galaxy Watch9) भारतात लाँच करत असल्याची घोषणा केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वर आधारित प्रगत आरोग्य ट्रॅकिंग, २५ ते ३० टक्क्यांनी सुधारलेली बॅटरी लाईफ आणि आकर्षक डिझाइन ही या घड्याळांची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. ही दोन्ही घड्याळे सध्या पूर्व-नोंदणीसाठी (Pre-order) उपलब्ध झाली असून ७ ऑगस्टपासून त्यांची विक्री सुरू होणार आहे.
१. गॅलेक्सी वॉच ULTRA 2: आऊटडोअर आणि खेळाडूंसाठी खास!
डिझाइन व डिस्प्ले: ४७ मिमी आकारातील टायटॅनियम बनावट (Titanium Silver & Grey) असलेले हे घड्याळ १२% अधिक बारीक असून त्यात ५००० नीट्सचा ब्राइटनेस डिस्प्ले दिला आहे, ज्यामुळे प्रखर उन्हातही स्क्रीन स्पष्ट दिसते.
बॅटरी व परफॉर्मन्स: ८०० एमएएचची (३५% मोठी) शक्तिशाली बॅटरी आणि क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन एलिट प्लॅटफॉर्म.
विशेष वैशिष्ट्ये: 'ट्रेल रन' मोड, घामावरून पाण्याची गरज सांगणारे 'न्यूट्रिशन अलर्ट' आणि १० एटीएम, IP69K प्रमाणीकरणासह डायव्हिंगसाठी 'मारेस' ॲप सुसंगतता.
किंमत: ४७ मिमी (LTE) – ₹६४,९९९
२. गॅलेक्सी वॉच 9: दैनंदिन वापर आणि आरोग्याची परिपूर्ण काळजी
डिझाइन व व्हॅरिएंट्स: ४० मिमी आणि ४४ मिमी अशा दोन आकारांत ॲल्युमिनियम केस आणि कुशन डिझाइनसह उपलब्ध. यात ३००० नीट्स ब्राइटनेस स्क्रीन दिली आहे.
बॅटरी: ४० मिमी (३९० mAh) आणि ४४ मिमी (४४५ mAh).
किंमती:
४० मिमी: BT व्हॅरिएंट – ₹३७,९९९ | LTE व्हॅरिएंट – ₹४१,९९९ (रंग: ग्रॅफाइट, क्रीम)
४४ मिमी: BT व्हॅरिएंट – ₹४०,९९९ | LTE व्हॅरिएंट – ₹४४,९९९ (रंग: ग्रॅफाइट, सिल्व्हर)
एआय-आधारित प्रगत 'हेल्थ फीचर्स'
या स्मार्टवॉचमध्ये एआय बायोसेन्सर्सच्या मदतीने झोपेचे विश्लेषण (व्हाइटल्स), हार्ट हेल्थ स्कोअर, डेली कार्डिओ लोड, फिटनेस इंडेक्स आणि ध्वनी-धोका सूचक (हिअरिंग) यांसारख्या आरोग्यविषयक सुविधा दिल्या आहेत. "एआयच्या मदतीने आरोग्य सेवा अधिक वैयक्तिक आणि प्रतिबंधात्मक बनवणे हे आमचे ध्येय आहे," असे सॅमसंग इंडियाचे व्हाईस प्रेसिडेंट आदित्य बब्बर यांनी स्पष्ट केले.
प्री-ऑर्डर आणि विशेष ऑफर्स
सवलती: प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना १,५०० रुपयांचा ॲक्सेसरीज लाभ, ९,५०० रुपयांची मल्टीबाय ऑफर किंवा ३,५०० रुपयांपर्यंतची अपग्रेड/बँक सवलत मिळेल.
ईएमआय: शून्य डाउन-पेमेंटसह २४ महिन्यांपर्यंतचे नो-कॉस्ट ईएमआय (No-cost EMI) पर्याय उपलब्ध आहेत.
सॅमसंग केअर+: Samsung.com वरून मासिक प्लॅन निवडणाऱ्या ग्राहकांना पहिले ३ महिने मोफत केअर+ प्रोटेक्शन दिले जाईल.