मागणी धर्मेंद्र प्रधानांची पण विकेट पडली या मंत्र्याची... केंद्रीय मंत्रिपदाचा का दिला राजीनामा?

Share:
Main Image
Last updated: 25-Jul-2026

नवी दिल्ली, (प्रतिनिधी) २५ जुलै - देशाची राजधानी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. NEET पेपरफुटी प्रकरणावरून शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधकांचे जंतर-मंतरवर निदर्शने सुरू असून, विद्यार्थ्यांच्या संसदेवरील मोर्चावर झालेल्या लाठीचार्जमुळे देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. या सर्व गदारोळातच दिल्लीतून आणखी एक मोठी राजकीय घडामोड समोर आली असून, केंद्रीय रेल्वे व अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी आपल्या मंत्रि‍पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर बिट्टू यांनी राजीनामा सुपूर्द केला असून, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तो तात्काळ स्वीकारला आहे.

राजीनाम्यामागे 'पंजाब मॉडेल' आणि राजकीय रणनीती?

रवनीत सिंग बिट्टू हे मूळचे पंजाबचे असून, २०२४ पासून ते राज्यसभेचे खासदार म्हणून केंद्रीय राज्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळत होते. आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा राजीनामा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

पंजाबमध्ये भाजप संघटन मजबूत करण्याचे उद्दिष्ट: पश्चिम बंगालनंतर आता भारतीय जनता पक्षाने आपला मोर्चा पंजाबवर वळवला आहे.

Advertisement

प्रमुख चेहरा म्हणून पुढे आणण्याची शक्यता: पंजाबमधील पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी रवनीत सिंग बिट्टू यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून मोकळे करून राज्यातील राजकारणात पूर्णवेळ सक्रिय केले जात असल्याचे सूत्रांकडून समजते.

दिल्लीत विद्यार्थ्यांचे आंदोलन; पोलिसांचा लाठीचार्ज

दुसरीकडे, NEET पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीत वातावरण पेटले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलक आक्रमक झाले असून, २० जुलै रोजी विद्यार्थ्यांनी संसदेवर काढलेल्या मोर्चादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज करत अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या. या घटनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

या तापलेल्या राजकीय वातावरणातच रवनीत सिंग बिट्टू यांच्या राजीनाम्यामुळे दिल्लीतील राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

?s=20

Comments

No comments yet.