तरुणांनो प्रतीक्षा संपली... तब्बल ५,७०७ सरकारी पदांसाठी भरती... या तारखेपर्यंत मुदत...

Share:
Main Image
Last updated: 24-Jul-2026

पुणे, (प्रतिनिधी) २४ जुलै - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. आयोगाने 'महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६' च्या पदसंख्येत मोठी वाढ जाहीर केली आहे. सुधारित पत्रकानुसार आता एकूण पदांची संख्या ५,७०७ वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेत तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) पदांचाही नव्याने समावेश करण्यात आला आहे.

२,६१९ वरून थेट ५,७०७ पदांवर भरती

एमपीएससीने २५ जून २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या मूळ जाहिरातीनुसार (क्र. ०१७/२०२६) सुरुवातीला २,६१९ पदांसाठी भरती जाहीर केली होती. मात्र, विविध शासकीय विभागांकडून प्राप्त झालेल्या नवीन मागणीपत्रांनुसार अतिरिक्त ३,०८८ पदांचा यात समावेश करण्यात आला आहे.

नव्याने समाविष्ट करण्यात आलेली मुख्य पदे:

ग्राम महसूल अधिकारी (तलाठी): १,५३९ पदे (पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी)

लिपिक-टंकलेखक (महसूल व नोंदणी विभाग): ८१९ पदे (४८० + ३३९)

सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक): २५४ पदे

नियंत्रक शिधावाटप व नागरी पुरवठा: २३० पदे

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग: १५५ पदे

Advertisement

आदिवासी विकास विभाग: ६९ पदे

वरिष्ठ लिपिक / अभिलेखापाल व इतर: २२ पदे

महत्त्वाच्या तारखा आणि परीक्षेचे स्वरूप:

पूर्व परीक्षा दिनांक: २५ ऑक्टोबर २०२६ (ऑफलाईन OMR पद्धतीने)

ऑनलाईन अर्ज करण्याची नवीन मुदत: ०५ ऑगस्ट २०२६ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत)

ऑनलाईन शुल्क भरण्याची मुदत: ०८ ऑगस्ट २०२६ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत)

शुल्क फक्त ऑनलाईन; आयोगाचे महत्त्वाचे आवाहन

ऑफलाईन चलनाची सोय बंद: परीक्षेचे शुल्क आता फक्त ऑनलाईन पद्धतीनेच (डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI) स्वीकारले जाईल.

संधी सोडू नका: पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी विविध विभागांचे सामाजिक व समांतर आरक्षणनिहाय तक्ते प्रसिद्ध केले जातील. त्यामुळे पदसंख्या कमी आहे समजून अर्ज भरणे टाळू नका, असे आवाहन आयोगाने केले आहे.

अधिकृत संकेतस्थळ: अधिक माहिती आणि अर्जासाठी उमेदवारांनी mpsc.gov.in किंवा mpsconline.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

No comments yet.