संतापजनक... मुंबईत आंदोलक तरुणीशी पोलिसांचे गैरवर्तन... सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल...

Share:
Main Image
Last updated: 24-Jul-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २४ जुलै - काही दिवसांपासून दिल्लीसह महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षा, पेपरफुटी आणि विविध मागण्यांवरून युवक-युवतींचे आंदोलन पेटले आहे. अशातच मुंबईतील दादर येथे पार पडलेल्या आंदोलनादरम्यान एका पुरुष पोलीस कर्मचाऱ्याने तरुण महिला आंदोलकाशी अश्लील वर्तन, धक्काबुक्की आणि गैरव्यवहार केल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवरून राजकीय वर्तुळातून तीव्र उमटले असून, विरोधी पक्षांनी राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

"डोक्यात तिडीक उठली!" — रोहित पवारांची संतप्त प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ एक्स (ट्विटर) वर पोस्ट करत थेट पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

"महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्याचे कृत्य पाहून डोक्याची तिडीक उठली आहे. अशा प्रकारे पोलिसांना कारवाई करण्याचा अधिकार आहे का? संबंधित कर्मचाऱ्याला तात्काळ पोलीस दलातून बडतर्फ करून त्याच्यावर विनयभंगाचा (Molestation) गुन्हा दाखल करून त्याला गजाआड केले पाहिजे," अशी जोरदार मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

विरोधकांचा चौफेर हल्ला:

Advertisement

वर्षा गायकवाड (अध्यक्ष, मुंबई काँग्रेस): दादरमधील आंदोलनातील हा व्हिडिओ पोस्ट करत वर्षा गायकवाड यांनी मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महिला आंदोलकांशी पुरुष पोलिसांनी अशा प्रकारे वर्तन करणे अत्यंत निंदनीय असल्याचे त्यांनी म्हटले.

जितेंद्र आव्हाड (आमदार, शरद पवार गट): हा व्हिडिओ शेअर करत आव्हाड यांनी इशारा दिला की, "हा पोलिसी अतिरेक सरकारच्या अंगाशी येईल, आवरा यांना!"

सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा संताप

दिल्लीतील जंतरमंतर ते मुंबईतील दादरपर्यंत आंदोलक तरुणांवर झालेला लाठीमार आणि महिला आंदोलकांसोबत झालेले गैरवर्तन याचे अनेक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. "खाकी वर्दीच्या जोरावर महिलांशी 'बॅड टच' आणि अश्लील वर्तन खपवून घेतले जाणार नाही," असा सूर नेटकऱ्यांमधून उमटत असून, संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

दरम्यान, या व्हिडीओमार्फत आपल्या कर्मचाऱ्याच्या वागण्याचा चुकीचा अर्थ लावला जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पुरुष आंदोलकावर कारवाई करत असताना महिला आंदोलक मध्ये आल्याचे मुबंई पोलिसांनी म्हटले आहे.

?s=20

Comments

No comments yet.