सातासमुद्रापार यूपीआयचा डंका... सिंगापूर, फ्रान्स, युएईसह इतक्या देशांमध्ये भारतीय डिजिटल पेमेंटची हवा...

Share:
Main Image
Last updated: 24-Jul-2026

नवी दिल्ली, (प्रतिनिधी) २४ जुलै - भारतातील डिजिटल पेमेंट प्रणाली असलेल्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ने नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. जून २०२६ पर्यंत देशात युपीआय वापरकर्त्यांची (UPI Users) संख्या तब्बल ५५.४९ कोटींवर पोहोचली आहे. अर्थ मंत्रालयाने लोकसभेत दिलेल्या एका लेखी उत्तरात ही माहिती जाहीर केली आहे.

केवळ युझर्सच नव्हे तर व्यवहारांच्या संख्येत आणि मूल्यातही मोठी वाढ झाली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये युपीआयद्वारे तब्बल २४,१६२ कोटी व्यवहार झाले असून, त्यांचे एकूण मूल्य ३१४ लाख कोटी रुपये इतके नोंदवले गेले आहे.

मागील ५ वर्षांतील यूपीआयची दमदार घोडदौड

आर्थिक वर्षव्यवहारांची संख्या (कोटींमध्ये)एकूण मूल्य (लाख कोटी रुपयांमध्ये)

२०२१-२२

४,५९५.६१

८४.१६

 

२०२२-२३

८,३७१.४४

१३९.१५

 

२०२३-२४

१३,११२.९५

१९९.९५

 

२०२४-२५

१८,५८६.६०

Advertisement

२६०.५६

 

२०२५-२६

२४,१६१.६९

३१४.२३

सातासमुद्रापार यूपीआयचा डंका: १२ देशांमध्ये सेवा सुरू

भारतीय पर्यटक आणि परदेशात राहणाऱ्या भारतीयांना सोप्या पद्धतीने व्यवहार करता यावेत, यासाठी NPCI International Payments Limited (NIPL) द्वारे युपीआयचे आंतरराष्ट्रीयीकरण केले जात आहे. आतापर्यंत जगातील १२ प्रमुख देशांमध्ये युपीआय आधारित व्यवहार (P2P आणि P2M) सुरू झाले आहेत.

भुतान (जुलै २०२१ पासून)

सिंगापूर (ऑगस्ट २०२१ - P2M, फेब्रुवारी २०२३ - P2P)

संयुक्त अरब अमिराती (UAE) (एप्रिल २०२२ पासून)

फ्रांस (फेब्रुवारी २०२४ पासून)

मॉरिशस (फेब्रुवारी २०२४ पासून)

श्रीलंका (फेब्रुवारी २०२४ पासून)

नेपाळ (मार्च २०२४ - P2M, जून २०२६ - P2P)

कतार (सप्टेंबर २०२५ पासून)

ग्रीस (मे २०२६ पासून)

कंबोडिया (जून २०२६ पासून)

सुरक्षित आणि पारदर्शक व्यवहारांवर भर

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत सांगितले की, युपीआय व्यवहार अधिक सुरक्षित, जलद आणि पारदर्शक करण्यासाठी सरकार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आणि एनपीसीआय द्वारे वेळोवेळी विविध उपाययोजना आणि सुधारणा केल्या जात आहेत.

Comments

No comments yet.