मॅस्कॉट (शुभंकर) तयार करा आणि जिंका २ लाख रुपयांची बक्षिसे...

Share:
Main Image
Last updated: 21-Jul-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २१ जुलै - स्वातंत्र्याच्या 'अमृत महोत्सवा'चे औचित्य साधत दूरसंचार मंत्रालयाच्या भारतीय टपाल विभागाने (India Post) देशभरातील नागरिकांच्या सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी एक सुवर्णसंधी आणली आहे. टपाल विभागाने इनोव्हेट इंडिया 'माय-जिओव्ही' (MyGov) प्लॅटफॉर्मवर ‘इंडिया पोस्ट शुभंकर (Mascot) आरेखन स्पर्धा’ सुरू केली आहे. विभागाची मूलभूत मूल्ये दर्शवणारा अधिकृत शुभंकर आणि त्याचे नाव सुचवून नागरिकांना एकूण २ लाख रुपयांची आकर्षक रोख बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

ब्रँड ॲम्बेसेडर बनण्याची संधी

टपाल विभागाची विश्वास, विश्वसनीयता, सर्वसमावेशकता, अखंड सेवा आणि डिजिटल नवोन्मेष ही मूल्ये प्रतिबिंबित करणारा एक वैशिष्ट्यपूर्ण 'ब्रँड ॲम्बेसेडर' (शुभंकर) तयार करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. निवडलेला शुभंकर टपाल विभागाचा अधिकृत चेहरा बनेल. त्याचा वापर रेल्वे/टपाल तिकीट उत्पादने, प्रचार मोहिमा, प्रदर्शने, समाज माध्यमे आणि अधिकृत संवादांमध्ये केला जाईल.

 बक्षिसांचे स्वरूप (एकूण २ लाख रुपये):

ही स्पर्धा दोन स्वतंत्र भागांत विभागली असून दोन्हीसाठी स्वतंत्र बक्षिसे आणि प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत.

१) सर्वोत्कृष्ट शुभंकर आरेखनासाठी (Mascot Design):

प्रथम क्रमांक: ७५ हजार रुपये

द्वितीय क्रमांक: ५० हजार रुपये

तृतीय क्रमांक: २५ हजार रुपये

२) सर्वोत्कृष्ट शुभंकर नावासाठी (Mascot Naming):

प्रथम क्रमांक: २५ हजार रुपये

Advertisement

द्वितीय क्रमांक: १५ हजार रुपये

तृतीय क्रमांक: १० हजार रुपये

 स्पर्धेत कसे सहभागी व्हावे?

पात्रता: ही स्पर्धा सर्व भारतीय नागरिकांसाठी खुली आहे.

काय सादर करावे?: सहभागींना मायजीओव्ही प्लॅटफॉर्मवर एक मूळ शुभंकर आरेखन (डिझाईन), शुभंकराचे एक योग्य नाव आणि त्यामागील संकल्पना स्पष्ट करणारी संक्षिप्त टीप सादर करावी लागेल.

कालावधी: ही स्पर्धा १५ जुलै ते १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत खुली राहील.

विद्यार्थी आणि कलाकारांना आवाहन:

टपाल विभागाने देशभरातील विद्यार्थी, डिझाइनर, कलाकार आणि सर्जनशील व्यावसायिकांना भारतीय टपाल विभागाची भविष्यातील दृश्य ओळख घडवण्यासाठी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

अधिकृत संकेतस्थळ: स्पर्धेचे नियम, अटी आणि प्रवेशिका सादर करण्यासाठी नागरिक येथे क्लिक करून किंवा

https://innovateindia.mygov.in/mascot-design-contest-for-india-post/

 या लिंकला भेट देऊ शकतात.

?s=20

Comments

No comments yet.