एसटीपाठोपाठ नाशिककरांना महागाईचा दुसरा दणका... ऑटोरिक्षाच्या भाड्यात मोठी वाढ...

Share:
Main Image
Last updated: 20-Jul-2026

मनोहर शिंदे, (नाशिक) २० जुलै - एसटीच्या भाडेवाढीनंतर नाशिककरांच्या खिशाला आणखी एक मोठा कात्री लावणारा निर्णय समोर आला आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (RTO) नाशिक शहरात ऑटोरिक्षासाठी सुधारित भाडेदर लागू केले आहेत. 

 खटुआ समितीच्या शिफारशींनुसार, वाढता महागाई निर्देशांक आणि इंधनाचे वाढलेले दर विचारात घेऊन ६ जुलै २०२६ पासून हे नवीन दर लागू करण्यात आले आहेत. प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

असे असतील नवीन भाडेदर:

नवीन दरपत्रकानुसार, रिक्षा प्रवाशांना आता पहिल्या दीड किलोमीटरच्या टप्प्यासाठी आणि पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

सुधारित रिक्षा भाडेदर (नाशिक):

पहिला टप्पा (किमान १.५ कि.मी. अंतरासाठी):

जुना दर: २५ रुपये

Advertisement

नवीन सुधारित दर: ३५ रुपये

पुढील प्रत्येक १ कि.मी. अंतरासाठी:

जुना दर: १८ रुपये

नवीन सुधारित दर: २३ रुपये

मीटर रि-कॅलिब्रेशनसाठी ५ सप्टेंबरपर्यंत मुदत

ऑटोरिक्षा परवानाधारकांना त्यांच्या वाहनांच्या भाडेमीटरचे रि-कॅलिब्रेशन (Calibration) करून घेण्यासाठी ६ जुलै २०२६ ते ५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मुदत देण्यात आली आहे.

महत्त्वाची सूचना: ज्या ऑटोरिक्षाधारकांनी दिलेल्या मुदतीत मीटरचे रि-कॅलिब्रेशन केले नाही, त्यांना जुने टॅरिफ कार्ड फक्त ५ सप्टेंबर २०२६ पर्यंतच वापरता येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.