जगातील सर्वांत मोठ्या दही उत्पादन प्रकल्पाचे आज भूमिपूजन... अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये...

Share:
Main Image
Last updated: 19-Jul-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १९ जुलै -  'सहकार से समृद्धी' या संकल्पनेला आणि 'श्वेत क्रांती २.०' च्या उद्दिष्टांना बळ देण्यासाठी आज एक ऐतिहासिक पाऊल पडत आहे. केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज (१९ जुलै २०२६) कोलकाता येथील न्यू टाउन कन्व्हेन्शन सेंटरमध्ये जगातील सर्वांत मोठ्या दही उत्पादन प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. 'अमूल बंगाल डेअरी' उपक्रमांतर्गत सुमारे ७०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून हा भव्य प्रकल्प साकारला जात आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्यासह सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

दररोज १० लाख किलो दह्याचे उत्पादन!
पश्चिम बंगालमधील हावडा फूड पार्कमध्ये हा प्रकल्प उभारला जात आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर येथे दररोज सुमारे ३० लाख लिटर दुधावर प्रक्रिया केली जाईल. विशेष म्हणजे, दररोज १ हजार मेट्रिक टन म्हणजेच तब्बल १० लाख किलो दही आणि इतर दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन करण्याची अवाढव्य क्षमता या प्रकल्पात असणार आहे.

Advertisement

 १.२५ लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; महिलांचा मोठा वाटा
या भव्य प्रकल्पामुळे पश्चिम बंगालमधील दुग्ध व्यवसाय क्षेत्राचा कायापालट होणार आहे.
राज्यातील सव्वा लाखांहून अधिक (१,२५,०००) दूध उत्पादक शेतकऱ्यांना या शाश्वत बाजारपेठेचा थेट फायदा होऊन त्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होईल.
यामध्ये ३० हजारांहून अधिक महिला दूध उत्पादकांचा समावेश असून, महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
हा प्रकल्प बंगालमधील धवल क्रांतीच्या (White Revolution) नव्या पर्वाची सुरुवात ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

थोडक्यात महत्त्वाचे 
१६ साठवण गोदामांचे भूमिपूजन व उद्घाटन: दुग्ध व्यवसायासोबतच कृषी पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी अमित शाह यांच्या हस्ते राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये एकूण १४०० मेट्रिक टन साठवण क्षमतेच्या १४ नव्या गोदामांचे भूमिपूजन (खर्च रु. ५.९८ कोटी) केले जाईल. तसेच दक्षिण २४ परगणा आणि कूचबिहार येथे उभारण्यात आलेल्या २ गोदामांचे उद्घाटन (खर्च रु. ७३.६१ लाख) करण्यात येणार आहे.
वाहतूक क्षेत्रासाठी सामंजस्य करार: याच कार्यक्रमात 'भारत टॅक्सी' आणि पश्चिम बंगाल सरकारच्या माहिती तंत्रज्ञान व इलेक्ट्रॉनिक्स विभाग यांच्यात राज्यातील वाहतूक सेवांचा विस्तार करण्यासाठी एका महत्त्वाच्या सामंजस्य कराराची (MoU) देवाणघेवाण केली जाईल.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.