मनोहर शिंदे, (नाशिक) १९ जुलै - भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नाशिक जिल्ह्यात सध्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत मतदारांना त्यांची पात्रता तपासणे, नवीन नाव नोंदणी करणे, गणना फॉर्म भरणे, तसेच सन २००२ च्या ऐतिहासिक यादीतील व सध्याच्या चालू यादीतील आपले नाव शोधणे सोपे व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व विधानसभा मतदारसंघ स्तरावर विशेष 'मदत कक्ष' (Help Desk) सुरू करण्यात आले आहेत. ही माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. या मदत कक्षांच्या माध्यमातून नागरिकांना मतदार नोंदणी प्रक्रियेबाबत येणाऱ्या अडचणी दूर केल्या जातील आणि आवश्यक ते कायदेशीर मार्गदर्शन केले जाईल.
नागरिकांनी आपल्या मतदारसंघातील खालील दूरध्वनी आणि मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधून मतदार यादीबाबतचे आपले प्रश्न किंवा शंकांचे निरसन करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे:
तुमच्या मतदारसंघातील मदत कक्षाचे संपर्क क्रमांक खालीलप्रमाणे:
जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक: ०२५३-२३१०५२३
११३- नांदगाव: ०२५५२-२४२०३२
११४- मालेगाव मध्य: ०२५५४-२५३११४
११५- मालेगाव बाह्य: ७९७२४८०१२०
११६- बागलाण: ०२५५५-२२३०३८
११७- कळवण: ८२०८४८१६६९, ७५८८१०६८६३
११७- सुरगाणा: ९९२३६९३०३२,
११८- चांदवड: ९४०३१५९८६९, ९९२२९०८८०६
११८- देवळा: ०२५९२-२२८५५४, ९६२३२६३७९९
११९- येवला: ०२५५९-२९९४०५
१२०- सिन्नर: ०२५५१-२२००२८, ८४४६३२०६१७
१२१- निफाड: ०२५५०-२९५१७४
१२२- दिंडोरी: ९४०५८२४५२५
१२२- पेठ: ०२५५८-२२५५३१
१२३- नाशिक पूर्व: ०२५३-२३१०५५६
१२४- नाशिक मध्य: ०२५३-२९७२१२४
१२५- नाशिक पश्चिम: ०२५३-२२३२३४६
१२६- देवळाली: ९२८४६३५३६९
१२७- इगतपुरी: ०२५५३-२४४०००
१२८- त्र्यंबकेश्वर: ०२५९४-२३३३३५५
आपल्या BLOचा नंबर शोधण्यासाठी लिंक