मुंबई, (प्रतिनिधी) १८ जुलै - भारतातील आघाडीची ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स रिटेल चेन 'विजय सेल्स'ने (Vijay Sales) ग्राहकांसाठी आपला बहुप्रतिक्षित वार्षिक 'ओपन बॉक्स क्लिअरन्स सेल' जाहीर केला आहे. या सेलच्या माध्यमातून ग्राहकांना प्रीमियम इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायन्सेस, मनोरंजन उत्पादने आणि स्मार्ट गॅजेट्स अत्यंत किफायतशीर किमतीत खरेदी करण्याची मोठी संधी मिळत आहे. देशातील सर्व विजय सेल्स रिटेल स्टोअर्समध्ये हा सेल मर्यादित कालावधीसाठी सुरू झाला असून, यामध्ये आघाडीच्या ब्रँड्सचे डिस्प्ले युनिट्स आणि शेवटच्या शिल्लक उत्पादनांवर (Last pieces) आकर्षक ऑफर्स देण्यात आल्या आहेत.
"आमचा ओपन बॉक्स क्लिअरन्स सेल हा वर्षातील सर्वात बहुप्रतिक्षित शॉपिंग इव्हेंट बनला आहे. ग्राहक त्यांच्या घरांचे आधुनिकीकरण करत असो, दैनंदिन जीवनावश्यक वस्तू बदलत असो किंवा नवीन गॅजेट्स खरेदी करत असो, आम्ही नेहमीची गुणवत्ता, विश्वास आणि उत्तम ग्राहक अनुभव कायम ठेवत या सेलमध्ये काही सर्वात मोठ्या ब्रँड्सना आकर्षक किमतीत एकत्र आणले आहे."
— निलेश गुप्ता, संचालक, विजय सेल्स
होम अन् किचन अप्लायन्सेसवर मोठी बचत
या सेलमध्ये घरगुती उपकरणांवर मोठी सवलत दिली जात आहे:
वॉशिंग मशीन्स: ५३% पर्यंत सूट. तोशिबा (९ किलो) आणि व्होल्टास बेको (७ किलो) थेट ५०% सवलतीत, तर व्होल्टास बेको सेमी-ऑटोमॅटिक (९ किलो) ५३% सुटीसह उपलब्ध.
रेफ्रिजरेटर्स: निवडक मॉडेल्सवर ५०% पर्यंत सूट. २४०-लिटर फ्रॉस्ट-फ्री रेफ्रिजेरेटर अवघ्या २०,९९० रुपयांत, तर प्रीमियम साईड-बाय-साईड रेफ्रिजेरेटर्सची सुरुवात ४९,९९० रुपयांपासून.
एअर कंडिशनर्स: १.५ टन ३ स्टार एसीवर जवळपास ५५% सूट.
किचन व इतर अप्लायन्सेस: तोशिबा डिशवॉशर २४,९९० रुपयांत उपलब्ध, तर मायक्रोवेव्ह व ओटीजीवर ४०% पर्यंत सूट. इस्त्री, व्हॅक्यूम क्लिनर आणि एअर प्युरिफायर यांसारख्या वस्तूंची सुरुवात केवळ ६९९ रुपयांपासून.
स्मार्ट टीव्ही आणि गॅजेट्सवर धमाकेदार ऑफर्स
मनोरंजनाचा अनुभव वाढवण्यासाठी एलईडी टीव्ही आणि ऑडिओ सिस्टीमवर विशेष सवलत आहे:
३२-इंच क्यूएलईडी (QLED) टीव्हीवर जवळपास ७०% सूट.
४३-इंच ४के स्मार्ट टीव्हीवर ४५%, तर ५५-इंच ४के मिनी-एलईडी टीव्हीवर ६०% पर्यंत सूट.
कोणताही एलईडी टीव्ही खरेदी केल्यास ३,९९० रुपयांपासून सुरू होणाऱ्या झेब्रोनिक्स साऊंडबार्सवर विशेष बंडल ऑफर (६०% पर्यंत बचत).
लॅपटॉप, टॅब्लेट, स्मार्टफोन यांसह अॅप्पलच्या उत्पादनांची विशेष श्रेणी मर्यादित स्टॉक असेपर्यंत क्लिअरन्स किमतीत उपलब्ध. ब्लूटूथ हेडफोन्स फक्त ९९९ रुपयांपासून, तर स्मार्टवॉचेस् १,४९९ रुपयांपासून सुरू.
बँकांच्या क्रेडिट व डेबिट कार्डवर विशेष त्वरित सवलत (Instant Discount)
खरेदी अधिक फायदेशीर करण्यासाठी विजय सेल्सने विविध बँकांसोबत भागीदारी केली असून, ग्राहकांना खालीलप्रमाणे त्वरित सूट मिळणार आहे:
बँक आणि कार्ड प्रकारअटी आणि किमान व्यवहारमिळणारी कमाल त्वरित सूट
HDFC बँक (EMI)₹७,५०० व त्यापेक्षा अधिकच्या व्यवहारावरजवळपास ₹७,५०० पर्यंत
ICICI बँक (EMI)₹१२,५०० व त्यापेक्षा अधिकच्या व्यवहारावर₹७,५००
American Express (EMI - फक्त वीकेंड)₹२५,००० पेक्षा अधिकच्या व्यवहारावरतब्बल ₹२०,००० पर्यंत
HSBC बँक (EMI - संपूर्ण आठवडा)₹२०,००० व त्यापेक्षा अधिकच्या व्यवहारावर₹१२,०००
HSBC बँक (Non-EMI - फक्त रविवार)₹२०,००० व त्यापेक्षा अधिकच्या व्यवहारावर₹६,०००
OneCard (EMI)₹१५,००० व त्यापेक्षा अधिकच्या व्यवहारावर₹२०,०००
AU Small Finance (EMI - संपूर्ण आठवडा)₹५,००० पेक्षा अधिकच्या व्यवहारावर (५%)₹५,०००
AU Small Finance (Non-EMI - फक्त शनिवार)₹१५,००० पेक्षा अधिकच्या व्यवहारावर₹१०,०००
Yes बँक (EMI)₹१०,००० पेक्षा अधिकच्या व्यवहारावर (५%)₹२,५००
DBS बँक (EMI / Non-EMI)EMI वर १०% तर Non-EMI वर (शुक्र ते रवि)अनुक्रमे ₹३,००० / ₹१,००० पर्यंत
सेल संपल्यानंतरही बचत: 'मायव्हीएस लॉयल्टी' उपक्रम
विजय सेल्सच्या या सेलमध्ये खरेदी करणारे सर्व ग्राहक आपोआप 'मायव्हीएस लॉयल्टी' (MyVS Loyalty) उपक्रमात समाविष्ट होतील. यामध्ये प्रत्येक खरेदीवर ०.७५% लॉयल्टी पॉईंट्स मिळतील. विशेष म्हणजे, ऑनलाइन किंवा स्टोअरमध्ये पुढील खरेदी करताना या एका पॉईंटचे मूल्य एक रुपया या दराने ते सहज वापरता येईल, ज्यामुळे सेल संपल्यानंतरही ग्राहकांची बचत सुरूच राहील.