सॅमसंगचा टेक विश्वात धमाका... केसापेक्षाही पातळ टायटॅनियम फिल्म... स्मार्ट फोनमध्ये...

Share:
Main Image
Last updated: 18-Jul-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १८ जुलै - ग्लोबल टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी 'सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स'ने (Samsung Electronics) नेक्स्ट-जनरेशन गॅलेक्सी फोल्डेबल डिवाईसेससाठी आपल्या क्रांतिकारी आणि अत्यंत प्रगत अशा 'फ्लेक्स टायटॅनियम' (Flex Titanium) तंत्रज्ञानाचे अनावरण केले आहे. फोल्डेबल तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी (Engineering) क्षेत्रातील सात पिढ्यांच्या संचित अनुभवाचा वापर करून सॅमसंगने ही नवीन डिस्प्ले रचना विकसित केली आहे. या तंत्रज्ञानामुळे फोल्डेबल स्मार्टफोनचा टिकाऊपणा लक्षणीयरीत्या वाढणार असून, स्क्रीनवर पडणारी घडी (क्रिज) कमी होऊन ग्राहकांना उत्कृष्ट व्ह्युईंग अनुभव मिळणार आहे.

स्लिमनेस आणि मजबुतीचा अनोखा समतोल
सॅमसंगने या नव्या डिस्प्ले रचनेत टायटॅनियमवर आधारित दोन अत्यंत महत्त्वाच्या घटकांचा वापर केला आहे, जे स्लिमनेस, स्थिरता आणि मजबुतीचा उत्तम समतोल राखतात:
१. टायटॅनियम-अलॉई फिल्म (Titanium-Alloy Film): ओएलईडी (OLED) पॅनेलच्या खाली असणारी ही फिल्म सामान्य पॉलिमर थरापेक्षा तब्बल २० पट अधिक मजबूत आहे. विशेष म्हणजे, ही फिल्म माणसाच्या केसाच्या १/३ भागाइतकी पातळ असल्याने स्क्रीन अधिक स्लिम आणि आकर्षक बनते.
२. टायटॅनियम प्लेट (Titanium Plate): प्रगत होल प्रोसेसिंग तंत्रज्ञानामुळे ही प्लेट डिस्प्ले मॉड्यूलशी घट्ट जोडली जाते. ही प्लेट स्क्रीन उघडल्यावर त्याला मजबूत आणि स्थिर आधार देते.

"फोल्डेबल श्रेणीतील सॅमसंगची ताकद वापरकर्त्यांच्या गरजा आमच्या तंत्रज्ञानाशी जोडण्यातून येते, जे दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष फायदे देतात. नेक्स्ट-जनरेशन गॅलेक्सी फोल्डेबल्सकरिता सॅमसंग डिवाईसेसमध्‍ये अपवादात्मक व्युईंग अनुभवांच्या जोरावर आम्ही वापरकर्त्यांचे अनुभव अधिक समृद्ध करू."
— सनघून मून, ईव्हीपी आणि सीनियर एक्झिक्‍युटिव्ह (हार्डवेअर), सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स

Advertisement

अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर आणि इंजिनिअरिंगचे आव्हान
सॅटेलाईट आणि मार्स रोव्हर (मंगळ मोहीम) यांसारख्या अत्यंत खडतर वातावरणात वापरल्या जाणाऱ्या टायटॅनियम धातूचा कडकपणा लक्षात घेता, त्याला फोल्डेबल स्क्रीनच्या रचनेत वापरणे इंजिनिअरिंगच्या दृष्टीने मोठे आव्हान होते. बाह्य धक्के सहन करणे, वारंवार फोल्ड होण्यासाठी स्थिर राहणे आणि अत्यंत पातळ असणे या आव्हानांवर मात करण्यासाठी सॅमसंगने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा यशस्वी मेळ घालत हे साध्य केले आहे.

पॉवर कार्यक्षमता आणि अधिक बॅटरी लाईफ
या डिस्प्लेमध्ये उच्च-रिझॉल्यूशन आर्किटेक्चर आणि नेक्स्ट-जनरेशन ऑर्गनिक मटेरिअल्सचा मेळ घालण्यात आला आहे. यामुळे स्क्रीनवरील दृश्ये केवळ स्पष्ट आणि सजीव दिसत नाहीत, तर डिस्प्लेची पॉवर कार्यक्षमता वाढून विजेचा वापर कमी होतो, ज्यामुळे स्मार्टफोनची बॅटरी जास्त काळ टिकण्यास मदत होईल.

"टायटॅनियम प्लेटच्या फोल्ड होणाऱ्या भागामध्ये अत्याधुनिक मायक्रो-पॅटर्न होलचा वापर करून आम्ही प्रबळ टिकाऊपणासह स्थिरता यशस्वीरित्या सुरक्षित केली आहे. नवीन ऑर्गनिक मटेरिअल्‍समुळे आम्ही नेक्स्ट-जनरेशन गॅलेक्सी फोल्डेबल डिवाईसेसची बाजारातील स्पर्धात्मकता अधिक दृढ करू."
— क्युंग-जिन यू, ईव्हीपी आणि प्रमुख (मोबाईल डिस्प्ले प्रॉडक्ट डेव्हलपमेंट), सॅमसंग डिस्प्ले

Advertisement

Comments

No comments yet.