जळगाव, (प्रतिनिधी) १४ जुलै - महाराष्ट्रात कचरा व्यवस्थापन हे आता केवळ स्वच्छतेचे काम न राहता वेगाने वाढणारे एक 'हरित उद्योग' (Green Business) क्षेत्र बनले आहे. वाढते शहरीकरण आणि कडक पर्यावरण नियमांमुळे या क्षेत्रात व्यवसायाच्या अभूतपूर्व संधी निर्माण झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर ‘अमृत’ (AMRUT) आणि ‘कुशाग्र इनोव्हेशन्स फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अमृत-सक्षम’ हा विशेष उद्योजकता विकास उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविला जात आहे, अशी माहिती जिमाका वृत्तसेवेद्वारे देण्यात आली आहे.
रोजच्या कचऱ्यातून नियमित उत्पन्नाचा मार्ग
योग्य तांत्रिक ज्ञान, व्यावसायिक मार्गदर्शन आणि बाजारपेठेची जोड मिळाल्यास या क्षेत्रात स्वतःचा यशस्वी ब्रँड निर्माण करता येऊ शकतो. या उपक्रमांतर्गत खालील व्यवसायांच्या सुवर्णसंधी उपलब्ध आहेत:
सुकलेल्या फुलांपासून अगरबत्ती आणि धूप बनविणे.
प्लास्टिक, कागद आणि काच रिसायकलिंग करणे.
‘रिसोर्स रिकव्हरी सेंटर’ (RRR) सुरू करणे.
कोणाला घेता येईल भाग? (पात्रता)
या क्षेत्रात उतरण्यासाठी कोणत्याही पूर्वानुभवाची आवश्यकता नाही. स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणारे युवक-युवती, महिला बचत गट, व्यवसायाचा विस्तार करू इच्छिणारे व्यावसायिक, निवृत्त अधिकारी-कर्मचारी, सामाजिक संस्था आणि पर्यावरणप्रेमी नागरिक या उपक्रमात अर्ज करू शकतात. पात्र उमेदवारांना अमृत संस्थेमार्फत विविध शासकीय योजनांचे लाभही दिले जातील.
नोंदणी कशी करावी?
इच्छुक उमेदवारांनी खालील संकेतस्थळावर (Websites) जाऊन आपला अर्ज भरावा:
नोंदणीसाठी थेट लिंक: [https://reference-url-citation.invalid/0](https://reference-url-citation.invalid/0)
अमृत अधिकृत संकेतस्थळ: [https://reference-url-citation.invalid/1](https://reference-url-citation.invalid/1)
पुढील प्रक्रिया: नोंदणी पूर्ण झाल्यानंतर ‘अमृत-सक्षम’ टीम उमेदवारांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधेल. त्यानंतर पात्र उमेदवारांना त्यांच्या जिल्ह्यातील कार्यशाळेची (Workshop) तारीख, वेळ आणि पुढील प्रक्रियेची माहिती दिली जाईल. अधिक माहितीसाठी नागरिक आपापल्या जिल्ह्यातील अमृत संस्थेच्या जिल्हा व्यवस्थापक कार्यालयाला भेट देऊ शकतात.
१६ जुलै रोजी 'लाईव्ह' माहिती सत्र
या व्यवसायासंदर्भात प्राथमिक माहिती देण्यासाठी १६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४:०० वाजता 'AMRUT' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर ([https://reference-url-citation.invalid/2](https://reference-url-citation.invalid/2)) एका विशेष लाईव्ह सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच नागरिक अधिक माहितीसाठी ७७५७०९१८५९ या क्रमांकावर थेट संपर्क साधू शकतात.