५० लाखांपर्यंत मिळेल कर्ज... सरकारच्या या सात पैकी कुठल्याही योजनेचा लाभ घ्या...

Share:
Main Image
Last updated: 15-Jul-2026

जळगाव, (प्रतिनिधी) १५ जुलै - महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ (जिल्हा कार्यालय, जळगाव) आणि त्यांच्या विविध उपकंपन्यांमार्फत राज्यातील इतर मागासवर्गीय (OBC) नागरिकांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध कर्ज व व्याज परतावा योजना राबविण्यात येत आहेत. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी जळगाव जिल्ह्याला मिळालेले भौतिक व आर्थिक उद्दिष्ट १०० टक्के साध्य करण्याचा महामंडळाचा मानस असल्याची माहिती जिल्हा व्यवस्थापकांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

या उपकंपन्यांमार्फत मिळणार लाभ

महामंडळांतर्गत विविध समाजांच्या कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेल्या खालील उपकंपन्यांचा यात समावेश आहे:

संत काशिबा गुरव, जगदज्योती महात्मा बसवेश्वर, संत सेनाजी महाराज केशशिल्पी, संत नरहरी महाराज, संत श्री संताजी महाराज, संत श्री रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ.

स्व. विष्णुपंत रामचंद्र दादरे (लोणारी), सोळा कुलस्वामिनी, श्री संत शिरोमणी नामदेव महाराज समस्त शिंपी समाज, संत भोजलिंग काका सुतार, लेवा पाटीदार समाज, सरदार वल्लभ पटेल गुजर समाज आणि आगरी समाज आर्थिक विकास महामंडळ.

महामंडळातर्फे राबविल्या जाणाऱ्या ७ प्रमुख योजना

जिल्हा कार्यालयामार्फत सध्या खालील सात योजनांतर्गत कर्ज आणि सवलती दिल्या जात आहेत:

१. २०% बीज भांडवल योजना

२. थेट कर्ज योजना: १ लाख रुपयांपर्यंत थेट कर्ज.

३. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना: बँकेकडून १५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावरील व्याज परतावा.

Advertisement

४. गट कर्ज व्याज परतावा योजना: १० लाख ते कमाल ५० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर लाभ.

५. शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना: १० लाख ते कमाल २० लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्जावरील व्याज परतावा.

६. महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना

७. कौशल्य विकास योजना

अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन

महामंडळाच्या या सर्व योजना पूर्णतः ऑनलाइन पद्धतीने राबविल्या जातात. इच्छुक आणि पात्र अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करणे अनिवार्य आहे.

अधिकृत संकेतस्थळ: www.msobcfdc.org

अधिक माहिती आणि संपर्कासाठी:

योजनांच्या सविस्तर माहितीसाठी नागरिकांनी खालील पत्त्यावर किंवा दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा:

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पहिला मजला, मायादेवी शनी मंदिराजवळ, जळगाव.

दूरध्वनी क्रमांक: ०२५७-२२६१९१८

Advertisement

Comments

No comments yet.