नाशिक, (प्रतिनिधी) ११ जुलै - राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा जिल्हाभरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भुजबळ फार्म, कार्यालय येथे भव्य सत्कार केला. दिलीप खैरे यांना जिल्ह्याची सूत्र दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांतून आलेल्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला मेळाव्याचे स्वरूप प्राप्त झाले.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, "दिलीप खैरे यांनी पक्षात विविध पदांवर काम करताना आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. संघटना उभारण्याचे, कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्याचे आणि पक्षाचा विस्तार करण्याचे कौशल्य त्यांच्यामध्ये आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या कामाचा विचार करूनच पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यात पक्ष अधिक बळकट होईल. कामाच्या जोरावर ते राज्यातील सर्वोत्तम जिल्हाध्यक्ष म्हणून नावलौकिक मिळवतील, असा मला ठाम विश्वास आहे."
यावेळी दिलीप खैरे यांनी पक्ष नेतृत्वाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याला सोबत घेऊन पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करणार असून जनतेचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या सत्कार सोहळ्यासाठी नाशिक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. भुजबळ फार्म परिसर घोषणांनी दुमदुमून गेला होता. मंत्री भुजबळांच्या सत्कारावेळी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. उपस्थितांच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे कार्यक्रम भव्यदिव्य वातावरणात पार पडला.
यावेळी बाळासाहेबजी कर्डक, प्रेरणाताई बलकवडे, कविताताई कर्डक, अंबादास खैरे, समाधान जेजुरकर, पूजा आहेर, चेतन कासव, योगेश निसाळ, योगिता आहेर, राहुल कदम, साहेबराव मढवई, सुनील पैठणकर, भाऊसाहेब भवर, रतन हलवर, दत्ता निकम, देविदास निकम, भालचंद्र भुजबळ, आकाश पगार, शशी बागुल, अजय दुबे, डॉ.योगेश गोसावी, शंकर मोकळ, राजेंद्र उफाडे, भाऊसाहेब धनवटे, कैलास देवरे, राजेंद्र सोनवणे, रामेश्वर साबळे, भारत जाधव, पांडुरंग राऊत, सचिन जगझाप, अजय गायकवाड, संतोष खैरनार, रविंद्र घोडेस्वार, मोहन शेलार, आशा भंदुरे, मेघा दराडे, संदीप खैरे, अजय कहांडबहाले, भाऊसाहेब कहांडबहाले, ज्ञानेश्वर दराडे, विजय पवार, भगवान ठोंबरे, मकरंद सोनवणे, सचिन सोनवणे, सुशांत काकड, उदय सराफ, पप्पू शिंदे, रमेश जाधव, संतोष डोमे, दुर्गेश चित्तोडे, राहुल घोडे, व्यंकटेश जाधव, मलिक मेंबर, पार्थ कासार, हबीब शेख, माधुरी एखंडे, नाना सोमवंशी, मुक्तार शेख, सुमित थोरात, गणेश गवळी, विशाल चव्हाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.