दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) ७ जुलै - हवामान खात्याने मंगळवार, ७ जुलै २०२६ रोजी नाशिक शहर आणि जिल्ह्यात ३०० मिलिमीटरपेक्षा जास्त ढगफुटीसदृश अतिशय मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर, शहरात पूर, झाडे किंवा घरे पडणे, आग अथवा इतर कोणतीही नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास नागरिकांच्या मदतीसाठी नाशिक महानगरपालिकेची २४ तास (24X7) आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाली आहे.
मनपा प्रशासनाने १ जून २०२६ पासूनच प्रत्येक विभागात आपत्कालीन कक्ष कार्यान्वित केले आहेत. "नागरिकांनी अतिवृष्टीच्या काळात अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, स्वतः सतर्क राहावे आणि कोणतीही आपत्तीजनक घटना घडल्यास त्वरित जवळच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा," असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.
नागरिकांच्या सुविधेसाठी नाशिक महानगरपालिकेने विभागीय कार्यालये, अग्निशमन केंद्रे आणि रुग्णालयांचे २४ तास सुरू असणारे संपर्क क्रमांक जाहीर केले आहेत:
१. मनपा विभागीय आपत्कालीन नियंत्रण कक्ष
मुख्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष (राजीव गांधी भवन): ०२५३-२५७१८७२, ०२५३-२३१७५०५
पंचवटी विभागीय कार्यालय (मखमलाबाद नाका): ०२५३-२५१३४९०
सातपूर विभागीय कार्यालय: ०२५३-२३५०३६७
नाशिक पूर्व विभागीय कार्यालय (मेनरोड): ०२५३-२५०४२३३
नाशिक पश्चिम विभागीय कार्यालय (पंडित कॉलनी): ०२५३-२५७०४९३
नवीन नाशिक विभागीय कार्यालय (अंबड पोलीस स्टेशन समोर): ०२५३-२३९२०१०
नाशिकरोड विभागीय कार्यालय: ०२५३-२४६०२३४
२. मनपा अग्निशमन केंद्रे (Fire Stations)
मुख्य अग्निशमन केंद्र (शिंगाडा तलाव): १०१, ०२५३-२५९०८७१
पंचवटी अग्निशमन केंद्र (मखमलाबाद नाका): ०२५३-२५१२९१९
सातपूर अग्निशमन केंद्र (त्र्यंबकरोड): ०२५३-२३५०५००
नवीन नाशिक अग्निशमन केंद्र (स्टेट बँक चौक): ०२५३-२३९३९६१
नाशिकरोड अग्निशमन केंद्र (विभागीय कार्यालय): ०२५३-२४६१३७९
पंचवटी विभागीय अग्निशमन केंद्र (अमृतधाम, मुंबई-आग्रा महामार्ग): ०२५३-२६२९१०४
३. आपत्कालीन वैद्यकीय मदतीसाठी मनपा रुग्णालये
अतिवृष्टीदरम्यान वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास खालील मनपा रुग्णालये आणि त्यांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधता येईल:
हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे रुग्णालय (नाशिकरोड): डॉ. कांचन लोकवाणी (९८६०८११९८८ / मूळ: ९८६०८१९८८), डॉ. शिल्पा काळे (९८५०२२६३७०)
सावित्रीबाई फुले रुग्णालय (सिन्नर फाटा, नाशिकरोड): डॉ. प्रशांत शेटे (९८२३६०३०४०), श्रीमती वळवी (९४२३४७६०१५)
इंदिरा गांधी रुग्णालय (पंचवटी): डॉ. रिना ढिकले (९४२२२४६७५५)
गंगापूर रुग्णालय (गंगापूर गाव): डॉ. योगेश कोशिरे (९८५०९७४३७७)
मायको प्रसूतिगृह (सातपूर): ०२५३-२३५०५९८ / डॉ. रुचिता पावसकर (९४२२२७५७०४)
डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय (कथडा, जुने नाशिक): ०२५३-२५९००४९ / डॉ. अविनाश फुलमाळी (९९२२५९४१०७)
श्री स्वामी समर्थ रुग्णालय (मोरवाडी, सिडको): ०२५३-२३९३४२५ / डॉ. विनोद पावसकर (९४२२२७५२२४)
जिजामाता प्रसूतिगृह (मेनरोड, नाशिक): ०२५३-२५९७९८१ / डॉ. स्वाती सावंत (९८५०८०८५६५)
प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आणि कोणतीही दुर्घटना घडल्यास तात्काळ वरील क्रमांकांवर संपर्क साधून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.