'टाटा'चा मास्टरस्ट्रोक... ६६५ किमी धावणार, ५.८ सेकंदात १०० चा वेग... बहुप्रतिक्षित सिएरा इव्ही आली...

Share:
Main Image
Last updated: 05-Jul-2026

पुणे, (प्रतिनिधी) ५ जुलै - भारतातील इलेक्ट्रिक वाहन (EV) क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी 'टाटा.इव्ही' (Tata.ev) ने भारतीय ऑटोमोबाईल बाजारात इतिहास पुन्हा नव्याने लिहीत आपली अत्यंत लोकप्रिय आणि आयकॉनिक ठरलेली कार 'सिएरा' आता संपूर्ण नवीन इलेक्ट्रिक अवतारात लाँच केली आहे. ऑल-न्यू सिएरा.इव्ही (Sierra.ev) ही कार तिच्या जुन्या, प्रसिद्ध डिझाईनचा वारसा जपत नेक्स्ट-जनरेशन ईव्ही तंत्रज्ञान आणि लक्झरी सोयी-सुविधांसह ग्राहकांच्या सेवेत सज्ज झाली आहे. या गाडीची सुरुवातीची किंमत १८.७९ लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. सिएरा.इव्हीचे अधिकृत बुकिंग आजपासून सुरू झाले असून, येत्या १५ जुलै २०२६ पासून ग्राहकांना या कारची डिलिव्हरी मिळण्यास सुरुवात होईल.

६६५ किमीची रेकॉर्डब्रेक रेंज आणि 'एक्सप्रेस चार्जिंग'

सिएरा.इव्ही खऱ्याखुऱ्या रस्त्यांवर आपली बादशाहत सिद्ध करण्यासाठी सज्ज झाली असून तिची तांत्रिक वैशिष्ट्ये थक्क करणारी आहेत:

दमदार रेंज: या कारला ६६५ किमीची एमआयडीसी (MIDC) रेंज आणि ५१० ते ५३० किमीची वास्तविक (Real-world) रेंज मिळते. सोबतच बॅटरीसाठी 'लाइफटाइम एचव्ही बॅटरी वॉरंटी' दिली जात आहे.

अल्ट्रा-फास्ट चार्जिंग: एक्सप्रेस चार्जिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने ही कार अवघ्या १५ मिनिटांत २६३ किमी प्रवासासाठी चार्ज होते.

सुपरफास्ट परफॉर्मन्स: ५०४ एनएम (Nm) टॉर्क आणि ३०६ पीएस (PS) च्या दमदार पॉवरमुळे ही गाडी अवघ्या ५.८ सेकंदांत ० ते १०० किमी/तास असा वेग पकडू शकते.

'गो एनीव्हेअर, डू एनीथिंग' क्षमता

Advertisement

या एसयूव्हीमध्ये चालकाला कोणत्याही रस्त्यावर सहज नियंत्रण मिळवता यावे यासाठी 'ड्युअल-मोटर क्यूडब्ल्यूडी' (All-Wheel Drive क्षमता), अल्ट्रा ग्लाइड सस्पेंशन आणि फ्रिक्वेन्सी डिपेंडंट डॅम्पिंग सिस्टीम देण्यात आली आहे. शहरातील रस्ते, हायवे किंवा खडतर रस्ते अशा सर्व परिस्थितींमध्ये ही कार अत्यंत स्थिर आणि आत्मविश्वासाने धावते.

केबिन नसून 'लक्झरी लाइफस्पेस'!

सिएरा.इव्हीचे अंतर्गत डिझाईन एखाद्या आलिशान लाउंजसारखे तयार करण्यात आले आहे. यामध्ये खालील अत्याधुनिक फीचर्सचा भरणा आहे:

पॅनोरामॅक्स सनरूफ: या सेगमेंटमधील सर्वात मोठे पॅनोरामॅक्स सनरूफ.

थिएटर प्रो अनुभव: केबिनमध्ये ट्रिपल स्क्रीन्स (तीन डिस्प्ले), डॉल्बी अ‍ॅटमॉस® (Dolby Atmos) आणि सोनिकशाफ्ट सिस्टीमचा कॉन्सर्ट-ग्रेड ऑडिओ अनुभव.

ई-वालेट सूट: सुरक्षिततेसाठी ५४०० एचडी कॅमेरासह '४साईट ब्लाइंड स्पॉट व्ह्यू', हायपएआर हेड-अप डिस्प्ले (HUD), डिजि अ‍ॅक्सेस, ऑटो पार्क आणि समन व रिव्हर्स असिस्ट फीचर्स.

"इलेक्ट्रिक युगातील प्रीमियम एसयूव्हीचा नवा मापदंड!"

या ऐतिहासिक लाँचिंगबाबत बोलताना टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्‍स लिमिटेडचे एमडी आणि सीईओ शैलेश चंद्रा म्हणाले, "सिएरा नेहमीच नव्‍हानिव्‍षता आणि प्रगतीचे प्रतीक राहिली आहे. आज सिएरा.इव्हीच्‍या माध्‍यमातून आम्‍ही तोच वारसा पुढे नेत आहोत आणि इलेक्ट्रिक युगात एक प्रीमियम एसयूव्‍ही कशी असावी, याचा नवीन मापदंड प्रस्‍थ‍ापित करत आहोत. ही वेईकल आमची आतापर्यंतची सर्वात प्रगत एसयूव्‍ही असून भारताच्‍या स्‍वच्छ, शून्‍य-उत्‍सर्जन भविष्‍याकडील प्रवासाला अधिक वेगवान करेल."

Advertisement

Comments

No comments yet.