पुणे, (प्रतिनिधी) ५ जुलै - जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी सॅमसंगने आज भारतीय बाजारपेठेत आपला नवा कोरा स्मार्टफोन 'सॅमसंग गॅलेक्सी ए२७ ५जी' (Samsung Galaxy A27 5G) लाँच करण्याची अधिकृत घोषणा केली. नावीन्यता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या फोनची निर्मिती करण्यात आली आहे. प्रामुख्याने तरुण पिढीची गरज लक्षात घेऊन आकर्षक डिझाइन, दीर्घकालीन सॉफ्टवेअर सपोर्ट, मजबूत सुरक्षा आणि सुटसुटीत युझर एक्सपिरियन्स यांचे उत्तम संयोजन या डिव्हाइसमध्ये पाहायला मिळते. ३ जुलैपासून हा फोन देशभरात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.
सिनेमॅटिक डिस्प्ले आणि मजबूत संरक्षण
नवीन गॅलेक्सी ए२७ ५जी मध्ये ६.७ इंचाचा भव्य 'सुपर एएमओएलईडी' (Super AMOLED) डिस्प्ले देण्यात आला असून, तो १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यामुळे युझर्सना व्हिडिओ पाहताना आणि गेमिंग करताना अत्यंत स्मूथ व्हिज्युअल्स आणि उत्कृष्ट टच रिस्पॉन्स मिळतो. याच्या इन्फिनिटी-ओ (Infinity-O) पंच-होल डिझाइनमुळे स्क्रीनचा वापर अधिक सुलभ होतो. विशेष म्हणजे, स्क्रीनच्या सुरक्षिततेसाठी यात 'कॉर्निंग® गोरिला® ग्लास व्हिक्टस®+' (Corning® Gorilla® Glass Victus®+) चे मजबूत संरक्षण देण्यात आले आहे, जे फोनला पडण्यापासून आणि ओरखड्यांपासून वाचवते.
वेगवान प्रोसेसर आणि प्रगत गेमिंग क्षमता
स्मार्टफोनच्या अंतर्गत रचनेत अत्यंत ऊर्जा-कार्यक्षम अशा ४ नॅनोमीटर (4nm) 'स्नॅपड्रॅगन ६ जेन ३' (Snapdragon 6 Gen 3) प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. त्याला 'यूएफएस ३.१' (UFS 3.1) स्टोरेज आणि 'एलपीडीडीआरएक्स५' (LPDDRX5) रॅमची आधुनिक जोड देण्यात आली आहे. सुधारित जीपीयू स्पीडमुळे जड ग्राफिक्स असलेले गेम्स खेळताना कोणताही अडथळा येत नाही. ही हाय-स्पीड मेमरी जलद डेटा ट्रान्सफर सुनिश्चित करते, ज्यामुळे मल्टिटास्किंग, इंटरनेट ब्राउझिंग आणि एआय अॅप्लिकेशन्स हाताळताना फोन अत्यंत वेगवान गतीने काम करतो.
५० मेगापिक्सल ओआयएस कॅमेरा आणि स्मार्ट एआय टूल्स
फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशन (OIS) आणि ४के व्हिडिओ रेकॉर्डिंग सपोर्ट असलेला ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, ५ मेगापिक्सलचा अल्ट्रावाईड कॅमेरा आणि ३०० डीपीआय क्षमतेचा २ मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा समाविष्ट आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी १२ मेगापिक्सलचा एचडीआर पोर्ट्रेट कॅमेरा समोर मिळतो. तसेच, फोटो एडिटिंग अधिक सोपे करण्यासाठी 'ऑब्जेक्ट इरेझर', 'एडिट सजेशन्स' आणि 'माय फिल्टर' यांसारखी प्रगत एआय टूल्स यात देण्यात आली आहेत.
गुगल जेमिनी आणि प्रगत कनेक्टिव्हिटी
या फोनमध्ये गुगल आणि सॅमसंगचे तंत्रज्ञान खोलवर एकवटलेले दिसते. 'सर्च विथ गुगल' वैशिष्ट्याद्वारे युझर्स एकाच वेळी स्क्रीनवरील अनेक गोष्टी शोधू शकतात. व्हॉईस रेकॉर्डर अॅपमध्ये २२ भाषांचे रिअल-टाइम व्हॉईस ट्रान्सक्रिप्शन उपलब्ध आहे. तसेच गुगल जेमिनी (Google Gemini) आणि परप्लेक्सिटी (Perplexity) सारखे एआय असिस्टंट गॅलेक्सी अॅप्समध्ये इन-बिल्ट आहेत. एआय-सक्षम 'लाइव्ह ट्रान्सक्रिप्शन' हे वैशिष्ट्य फोन कॉल्स आणि व्हॉईसमेल एकाच वेळी इंग्रजी, हिंदी आणि गुजराती भाषेत स्क्रीनवर लिखित स्वरूपात सादर करते.
किंमत, ऑफर्स आणि उपलब्धता
हा स्मार्टफोन लाइट ग्रीन, light पिंक आणि ब्लॅक अशा तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध होईल. सॅमसंग या मॉडेलसाठी ६ अँड्रॉइड ओएस अपग्रेड्स आणि ६ वर्षांचे सुरक्षा अपडेट्स देणार आहे, ज्यामुळे हा फोन प्रदीर्घ काळ सुरक्षित राहील.
व्हेरियंटनुसार किमती खालीलप्रमाणे आहेत:
६ जीबी रॅम + १२८ जीबी: ₹ २८,९९९ (प्रभावी किंमत)
८ जीबी रॅम + १२८ जीबी: ₹ ३१,९९९
८ जीबी रॅम + २५६ जीबी (टॉप मॉडेल): ₹ ३७,४९९
लाँच ऑफर्स:
बँक कार्ड किंवा यूपीआयद्वारे खरेदी केल्यास ग्राहकांना ३,००० रुपयांचा इन्स्टंट कॅशबॅक मिळणार आहे. याशिवाय, निवडक फायनान्स कंपन्यांद्वारे १५ या महिन्यांपर्यंतच्या 'झिरो डाउन पेमेंट ईएमआय' किंवा २४ महिन्यांच्या सुलभ ईएमआय योजनेचा लाभ घेता येईल. ग्राहक हा फोन सॅमसंग एक्सक्लुझिव्ह आउटलेट्स, पार्टनर स्टोअर्स, सॅमसंगडॉटकॉम आणि इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून खरेदी करू शकतात.