केतन अग्रवाल हत्या प्रकरण... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वपूर्ण घोषणा...

Share:
Main Image
Last updated: 28-Jun-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २८ जून - लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या केतन अग्रवाल यांच्या दुर्दैवी आणि धक्कादायक हत्या प्रकरणातील दोषींना कायद्यानुसार कठोरतम शिक्षा मिळवून देण्यासाठी राज्य शासन खंबीरपणे पावले उचलत आहे. या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात (Fast Track Court) चालवला जाईल, तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी देशातील ख्यातनाम कायदेतज्ज्ञ आणि ज्येष्ठ विधीज्ज्ञ उज्वल निकम यांची 'विशेष सरकारी वकील' (Special Public Prosecutor) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.

केतन अग्रवाल यांचे वडील विशाल अग्रवाल यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपल्या मुलाच्या हत्येप्रकरणी सखोल चौकशी आणि न्यायाची मागणी केली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी अग्रवाल कुटुंबाचे सांत्वन करत सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्र्यांचे विधी व न्याय विभागाला तातडीचे निर्देश

Advertisement

विशाल अग्रवाल यांनी मुख्यमंत्र्यांकडे हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. ही मागणी मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मान्य केली. त्यांनी विधी व न्याय विभागाच्या सचिवांना या संदर्भातील आवश्यक ती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे, ज्येष्ठ विधीज्ज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांनीही या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहण्यास आपली संमती दर्शविली आहे.

कुटुंबाला न्याय देण्यास सरकार कटिबद्ध

"या दुर्दैवी घटनेतील गुन्हेगारांना पाठीशी घातले जाणार नाही. आरोपींना कठोर शिक्षा करून अग्रवाल कुटुंबाला संपूर्ण न्याय मिळवून देण्यासाठी शासन कोणतीही कसर सोडणार नाही," अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. ॲड. निकम यांच्या नियुक्तीमुळे आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास आणि न्यायालयीन लढाई अधिक मजबूत होणार असून, आरोपींना लवकरात लवकर शिक्षा होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.