शिक्षकांनो, तुम्हाला राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार हवाय? बस्स फक्त एवढे करा...

Share:
Main Image
Last updated: 25-Jun-2026

पुणे, (प्रतिनिधी) २५ जून -  केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार- २०२६ साठी ऑनलाईन स्व-नामांकन प्रक्रियेस प्रारंभ झाला असून राज्यातील पात्र शिक्षकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे.

शिक्षण संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी स्व-नामांकन प्रक्रिया दि. १५ जून २०२६ पासून सुरू झाली आहे. राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच मान्यताप्राप्त अनुदानित खाजगी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांना या पुरस्कारासाठी अर्ज करता येणार आहे.

Advertisement

पात्र शिक्षकांनी https://nationalawardstoteachers.education.gov.in या वेबपोर्टलवर दि. १० जुलै २०२६ पर्यंत स्व-नामांकन नोंदवावे. तसेच अर्जदारांनी आपले स्व-नामांकन अंतिम करून दि. १३ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे.

राज्यातील अधिकाधिक पात्र शिक्षकांनी राष्ट्रीय स्तरावरील या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी अर्ज करून आपल्या शैक्षणिक कार्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यासाठी ही संधी साधावी, असे आवाहन शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. महेश पालकर यांनी केले आहे.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.