'एमडी', 'गांजा'नंतर आता नाशिकमध्ये 'अफेक्टामाइन'ची विक्री... पोलिसांनी असा लावला छडा...

Share:
Main Image
Last updated: 25-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २५ जून - गेल्या सहा महिन्यांत नाशिक शहर पोलिसांनी अंमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध मोठी मोहीम उघडली आहे. जानेवारी ते जून २०२६ या काळात शहर पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईत तब्बल ३८ संशयितांना जेरबंद करण्यात आले असून, सव्वा कोटी रुपयांहून अधिक किमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान, या कारवाईत एमडी (मॅफेड्रोन) आणि गांजासारख्या पारंपरिक अंमली पदार्थांसोबतच 'अफेक्टामाइन' (Amphetamine) या नवीन आणि घातक अंमली पदार्थाचा शहरात शिरकाव झाल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

सहा महिन्यांची आकडेवारी (जानेवारी ते जून २०२६)

शहर पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या सहा महिन्यांत अंमली पदार्थांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांतर्गत करण्यात आलेल्या कारवायांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

अंमली पदार्थाचे नाव गुन्हे अटकेतील आरोपी किंमत (रुपये)

एमडी (मॅफेड्रोन)१२  २४  ७१,७१,७१०

गांजा ०३.  ०८.  १२,१८,७६०

अफेक्टामाइन ०१.  ०३.  २४,३५,०००

एकूण १६. ३८.  १,०८,२५,४७०

Advertisement

एमडीचा विळखा घट्ट

शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सर्वाधिक गुन्हे एमडी (मॅफेड्रोन) विक्री, साठा व सेवनाचे नोंदवण्यात आले आहेत. या काळात ५५९.३९८ मिली ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले असून, त्याची बाजारपेठेत मोठी किंमत आहे. या अंमली पदार्थांच्या वाढत्या वापरावर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष 'ड्रग ड्राइव्ह' सुरू ठेवला आहे.

चिंताजनक बाब: 'अफेक्टामाइन'चा प्रवेश

पारंपरिक अमली पदार्थांच्या व्यसनासोबतच आता 'अफेक्टामाइन'सारख्या सिंथेटिक अमली पदार्थांचा नाशकात शिरकाव होणे ही चिंतेची बाब ठरत आहे. पोलिसांनी याप्रकरणी एक गुन्हा दाखल केला असून, ४८७ ग्रॅम मुद्देमाल जप्त केला आहे. नवीन पिढीला विळखा घालणाऱ्या या नव्या अमली पदार्थाच्या तस्करांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेची पथके सतर्क झाली आहेत.

पोलीस प्रशासनाचा इशारा

शहरात अंमली पदार्थांच्या विक्रीची साखळी मोडीत काढण्यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून कठोर पावले उचलली जात आहेत. अंमली पदार्थ बाळगणे, विक्री करणे किंवा सेवन करणे हा गंभीर गुन्हा असून, यात गुंतलेल्या कुणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिला आहे.

अडीच वर्षात २.३५ कोटींचा मुद्देमाल जप्त

गेल्या अडिच वर्षात आयुक्तालयाने धडाकेबाज कारवाई करीत ८४ गुन्हे दाखल करीत १८२ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईत तब्बल २ कोटी ३५ लाख १० हजार २८१ रूपये किमतीचा विविध प्रकारचा अमली पदार्थाचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यात गांजा,चरस भांग बरोबरच मॅफेड्रॉन आणि अफेटामाईन नावाच्या ड्रग्जचा समावेश आहे.    

Advertisement

Comments

No comments yet.