खरीप हंगामासाठी मोठी बातमी... 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' ओलांडून खतांची ४ जहाजे भारताकडे...

Share:
Main Image
Last updated: 24-Jun-2026

नवी दिल्ली, (प्रतिनिधी) २४ जून - जागतिक व्यापारातील सध्याच्या भू-राजकीय आव्हानांमधून यशस्वी मार्ग काढत, भारताच्या खत सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा युरिया, डीएप (DAP) आणि गंधकाचा (सल्फर) साठा वाहून नेणाऱ्या चार मालवाहू जहाजांनी 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' यशस्वीपणे ओलांडली आहे. ही जहाजे सध्या देशातील कृष्णपट्टणम, काकिनाडा, पारादीप आणि मुंद्रा या नियोजित बंदरांच्या दिशेने वेगाने पुढे सरकत आहेत. बंदरांवर पोहोचताच हा माल त्वरित उतरवून देशातील खतांचा राखीव साठा आणखी मजबूत केला जाईल.

गेल्या वर्षीच्या तुलनेत खतांचा विक्रमी साठा

२२ जून २०२६ पर्यंत भारताकडे १९६.०८ लाख टन इतका भक्कम खतांचा संचित साठा उपलब्ध आहे. मागील वर्षी याच कालावधीत हा साठा १६८.६७ लाख टन होता.

सध्या उपलब्ध असलेल्या मुख्य खतांची आकडेवारी (लाख टनात):

चालू हंगामात खतांच्या विक्रीतही वाढ झाली असून १ मार्च ते २१ जून २०२६ दरम्यान १५३.४ लाख टन खतांची विक्री झाली आहे, जी गेल्या वर्षीपेक्षा १३.२ लाख टनाने अधिक आहे.

Advertisement

देशांतर्गत उत्पादनाला गती आणि जागतिक निविदांचा टप्पा

जागतिक बाजारपेठेतील अनपेक्षित धक्क्यांपासून भारतीय शेतकऱ्यांचे रक्षण करण्यासाठी सरकारने स्वदेशी उत्पादनावर भर दिला आहे. देशांतर्गत उत्पादन तब्बल १३३.१२ लाख मेट्रिक टनांवर पोहोचले असून, त्याला ४३.६९ लाख मेट्रिक टन आयातीचे उत्तम पाठबळ मिळाले आहे.

तसेच, भारताने ताज्या जागतिक निविदेद्वारे १७.७० लाख मेट्रिक टन युरियाचा यशस्वी करार केला आहे. या सुयोग्य नियोजनामुळे चालू खरीप हंगामासाठी जागतिक बाजारपेठेतून ९० लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त युरिया आणि पी अँड के (P&K) खतांचा पुरवठा पूर्णपणे सुरक्षित करण्यात आला आहे.

२८ भारतीय दूतावासांचे राजनैतिक यश

परदेशातील २८ भारतीय दूतावासांच्या सक्रिय राजनैतिक समन्वयामुळे ओमान, रशिया, मलेशिया, अमेरिका, मोरोक्को आणि इजिप्त यांसारख्या अनेक देशांमधून विविध सागरी मार्गांद्वारे खतांची आयात करणे भारताला शक्य झाले आहे. खत विभाग सध्या राज्य सरकारे आणि सहकारी संस्थांच्या जाळ्याशी थेट समन्वय ठेवून असून, देशातील खत पुरवठा मजबूत आणि सुव्यवस्थित राहील याची पूर्ण खात्री देण्यात आली आहे.

Advertisement

Comments

No comments yet.