विद्यार्थ्यांनी साकारल्या संत व कवींच्या भूमिका... सिडकोच्या मॉडर्न शाळेत रंगला हा अनोखा सोहळा...

Share:
Main Image
Last updated: 24-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २३ जून - येथील मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये संस्थेचे संस्थापक सदस्य (फाउंडर मेंबर) प्रा. यशवंत प्रभाकर कुलकर्णी यांच्या जयंतीनिमित्त 'विश्व मराठी परिवार दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेत विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Advertisement

मराठी भाषेची समृद्धी आणि संस्कृतीची जोपासना करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात निबंध स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्त्व कळावे आणि मातृभाषेविषयी गोडी निर्माण व्हावी, यासाठी विद्यार्थ्यांनी मराठी भाषेतील थोर संत व श्रेष्ठ कवींची वेशभूषा करून विविध पात्रे जिवंत केली. या प्रसंगी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषा आणि संस्कृतीचे जीवनातील स्थान याविषयी बहुमोल मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, मुख्याध्यापिका साक्षी ठकुरेल, रेणू जोशी यांच्यासह शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या उपक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सर्व स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.

Advertisement

Comments

No comments yet.