राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे करणार जिल्हा दौरा... पक्ष संघटन मजबूत करण्यावर विशेष भर...

Share:
Main Image
Last updated: 23-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २३ जून - मतदार विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR) मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी, मतदार यादी अद्ययावत करण्याबाबत जनजागृती तसेच पक्ष संघटना अधिक सक्षम व बळकट करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दि.२८ जून पासून पुढील आठ दिवस नाशिक जिल्हाभर व्यापक दौरा करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष दिलीप आण्णा खैरे यांनी दिली.

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार विशेष सखोल पुनर्निरीक्षण मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे. या मोहिमेची माहिती तळागाळातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे स्वतः जिल्हाभर दौरा करणार आहेत.

या दौऱ्यादरम्यान प्रत्येक विधानसभा मतदारसंघ, तालुका व शहर स्तरावर बैठका आयोजित करण्यात येणार असून विधानसभा अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, विविध सेलचे अध्यक्ष, आघाड्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाणार आहे. विशेष सखोल पुनर्निरीक्षण मोहिमेची उद्दिष्टे, मतदार यादीतील पात्र मतदारांची नोंदणी, नवमतदारांचा समावेश, आवश्यक दुरुस्त्या, बूथस्तरावरील संघटन बळकटीकरण तसेच पक्षविस्तार या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

Advertisement

पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविणे, प्रत्येक बूथपर्यंत पक्षाची भूमिका पोहोचविणे आणि मतदार विशेष सखोल पुनर्निरीक्षण मोहिमेला यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

असा असेल जिल्हा दौरा........

Advertisement

Comments

No comments yet.