शत्रूच्या गोटात धडकी... भारताने डागले संपूर्ण स्वदेशी बनावटीचे लांब पल्ल्याचे क्रूझ क्षेपणास्त्र...

Share:
Main Image
Last updated: 17-Jun-2026

नवी दिल्ली, (प्रतिनिधी) १७ जून - भारताच्या संरक्षण क्षेत्रात आज एका सुवर्णअक्षराची भर पडली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) आज (१५ जून २०२६) ओदिशाच्या किनारपट्टीवर असलेल्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून लांब पल्ल्याच्या जमिनीवर मारा करणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्राची (LRLACM - Long Range Land Attack Cruise Missile) यशस्वी चाचणी घेतली. चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी श्रेणीद्वारे (ITR) तैनात केलेल्या विविध आधुनिक ट्रॅकिंग उपकरणांनी केलेल्या नोंदीनुसार, या चाचणीदरम्यान ठेवण्यात आलेली सर्व उद्दिष्टे क्षेपणास्त्राने यशस्वीरित्या साध्य केली.

हे लांब पल्ल्याचे क्रूझ क्षेपणास्त्र संपूर्णपणे स्वदेशी बनावटीचे (Made in India) आहे. या क्षेपणास्त्राच्या सर्व उपप्रणाल्या डीआरडीओच्या विविध प्रयोगशाळा आणि भारतीय उद्योग क्षेत्रातील भागीदारांनी मिळून विकसित केल्या आहेत. बंगळुरू येथील एरोनॉटिकल विकास संस्था (ADE) ही या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठीची मुख्य समन्वयक प्रयोगशाळा म्हणून काम पाहत आहे.

संरक्षण दलांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित

Advertisement

या ऐतिहासिक प्रक्षेपणादरम्यान डीआरडीओचे वरिष्ठ वैज्ञानिक, हे क्षेपणास्त्र भविष्यात प्रत्यक्ष वापरात आणणाऱ्या भारतीय नौदल (Indian Navy) आणि भारतीय वायुसेनेचे (Indian Air Force) प्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या चाचणीच्या यशामुळे भारताच्या तिन्ही दलांची ताकद कमालीची वाढणार आहे.

पथकाचे संरक्षणमंत्र्यांकडून कौतुक

लांब पल्ल्याच्या जमिनीवर मारा करणाऱ्या या क्रूझ क्षेपणास्त्राच्या अभूतपूर्व यशाबद्दल देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचे वैज्ञानिक, तंत्रज्ञ आणि उद्योगक्षेत्रातील सर्व भागीदारांचे मनापासून अभिनंदन केले आहे. तसेच संरक्षण सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष राजेश कुमार सिंह यांनी स्वतः या प्रक्षेपणादरम्यानच्या सर्व घडामोडींवर बारकाईने देखरेख ठेवली होती. चाचणी यशस्वी झाल्यानंतर त्यांनीही संपूर्ण पथकाचे कौतुक केले. या यशस्वी चाचणीमुळे भारताने लांब पल्ल्याच्या क्रूझ क्षेपणास्त्र तंत्रज्ञानात स्वावलंबन मिळवले असून, जागतिक पातळीवर भारताचा लष्करी दबदबा अधिक मजबूत झाला आहे.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.