९४ कर्करोगग्रस्त बालकांच्या जीवनात नवी उमेद... या कंपनीने दिली ५० लाखांची मदत...

Share:
Main Image
Last updated: 18-Jun-2026

मुंबई, (विशेष प्रतिनिधी) १८ जून - अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (CSR) कर्करोगाचा संशय असलेल्या बालरुग्णांसाठी तातडीची आपत्कालीन निदान सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमामुळे देशभरातील ९४ बालकांच्या आणि त्यांच्या पालकांच्या जीवनात नवी उमेद जागविण्याचे अत्यंत संवेदनशील आणि प्रेरणादायी काम झाले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सुविधेचे आणि अफकॉन्स कंपनीचे कौतुक केले आहे. अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने वर्ष २०२५-२६ मध्ये शिक्षण, आरोग्य सेवा आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रांमध्ये सीएसआरच्या माध्यमातून विविध लोककल्याणकारी उपक्रम राबविले आहेत. यामध्ये शिक्षण क्षेत्राला विशेष प्राधान्य देतानाच, कंपनीने आरोग्य क्षेत्रातही तितकेच मोलाचे पाऊल उचलले आहे.

 टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या 'आपत्कालीन सेवे'ला बळ

देशभरातून मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या आणि कर्करोगाचा संशय असलेल्या बालरुग्णांसाठी तातडीची निदान सुविधा मिळावी, या उद्देशाने अफकॉन्सने पुढाकार घेतला. कंपनीने "कर्करोगाचा संशयित आजार असलेल्या बालरुग्णांसाठी आपत्कालीन निदान सहाय्य सेवा" या विशेष योजनेसाठी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. या मदतीमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील ९४ बालकांना कर्करोगाचे तातडीने निदान आणि आवश्यक असणाऱ्या महागड्या वैद्यकीय तपासण्या विनामूल्य व वेळेत उपलब्ध होऊ शकल्या.

 वेळेवर निदान होणे हेच संजीवनी: मुख्यमंत्री

Advertisement

या उपक्रमाचे कौतुक करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "कर्करोगासारख्या गंभीर आणि जीवघेण्या आजारामध्ये वेळेवर निदान होणे अत्यंत महत्त्वाचे असते. बऱ्याचदा केवळ आर्थिक अडचणींमुळे गरीब कुटुंबांना आवश्यक त्या तपासण्या वेळेत करता येत नाहीत आणि आजार बळावतो. अशा परिस्थितीत अफकॉन्सने दिलेली ही ५० लाखांची मदत केवळ आर्थिक साहाय्य नसून अनेक चिमुरड्यांच्या उपचार प्रक्रियेला गती देणारी आणि त्यांच्या पालकांना मोठा मानसिक दिलासा देणारी ठरली आहे."

ते पुढे म्हणाले की, "शासनाच्या प्रयत्नांना जर उद्योग क्षेत्राची अशीच संवेदनशील साथ मिळाली, तर आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक विकासाची मोठी उद्दिष्टे आपण अधिक वेगाने साध्य करू शकतो. समाजातील दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील भागीदारी (PPP) अधिक बळकट होणे काळाची गरज आहे."

शाश्वत विकासासाठी कॉर्पोरेट क्षेत्राची बांधिलकी

कॉर्पोरेट क्षेत्राच्या सामाजिक बांधिलकीचे (CSR) हे एक उत्कृष्ट आणि आदर्श उदाहरण असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले की, अफकॉन्सने शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राबरोबरच महिला सक्षमीकरणाच्या उपक्रमांमध्ये केलेली गुंतवणूक ही शाश्वत विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. समाजातील तळागाळातील आणि गरजू घटकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी अशा उपक्रमांची भूमिका अत्यंत मोलाची ठरते.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.