मनोहर शिंदे, (नाशिक) १४ जून - क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे पहिल्यांदाच आयोजित ‘प्लॉट एक्सपो ‘ म्हणजे प्लॉटच्या प्रदर्शनास मिळालेल्या प्रतिसादाने नाशिकच्या अर्थकारणास बूस्ट मिळणार आहे. या दोन दिवसीय प्रदर्शनाचा १४ जून रोजी समारोप झाला. या दोन दिवसांत १५० हून अधिक प्लॉटची विक्री झाली असून एक्स्पो ला सुमारे ६००० नागरिकांनी भेट दिली असल्याची माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी दिली. प्रदर्शन कालावधीत ३०० हून अधिक साईट विजिट देखील झाल्या असून आगामी काळात देखील अनेक साईट विजिटचे नियोजन झाले असल्याचे ते म्हणाले.
जमिनीमध्ये गुंतवणूक करणे हा एक अत्यंत सुरक्षित, स्थिर आणि दीर्घकाळात उत्तम परतावा देणारा पर्याय मानला जातो. जमिनीच्या वाढत्या किमती आणि मर्यादित उपलब्धता यामुळे ही गुंतवणूक नेहमीच फायदेशीर ठरते. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्लॉटच्या प्रदर्शनाचे आयोजन हे पहिल्यांदाच होत असून याला मिळालेला प्रतिसाद म्हणजे भविष्यातील नाशिक मधील उत्तम परतावा देणारी आज केलेली गुंतवणूक म्हणावे लागेल असे प्रतिपादन एक्स्पो चे समन्वयक भूषण कोठावदे यांनी सांगितले.
अधिक परतावा, मर्यादित पुरवठा, कमी देखभाल खर्च, आर्थिक सुरक्षितता आणि स्थिरता,लवचिकता आणि पसंतीनुसार बांधकाम डिझाइन ,दीर्घकालीन वारसा या कारणांनी जमिनीमध्ये गुंतवणूक करण्याकडे कल दिसून आल्याचे सांगत रियल इस्टेट क्षेत्रामध्ये क्रेडाई ची ओळख ही एक विश्वासार्ह संस्था म्हणून आहे. त्यामुळे क्रेडाई ने आयोजित केलेल्या प्लॉट एक्स्पो ला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे क्रेडाई एक्स्पो कमिटी प्रमुख मनोज खिवसरा यांनी नमूद केले.
नाशिक मधील वाढत्या पायाभूत सुविधा तसेच उत्तम कनेक्टिव्हिटी आणि आगामी कुंभ या पार्श्वभूमीवर नाशिक सहित मुंबई ,पुणे ,जळगाव ,धुळे , कोल्हापूर, अहमदनगर येथून देखील अनेकांनी एक्स्पो ला भेट दिली असल्याची माहिती सहसमन्वयक शाम साबळे यांनी दिली.
समृद्ध आणि प्रगतिशील नाशिक मध्ये स्वतःचे टुमदार घर, घरासमोर अंगण ,अंगणात बाग, घरावर स्वतःची गच्ची अशी स्वप्न साकार करण्याची तसेच भविष्यातील लाभासाठी प्रगतिशील नाशिक मध्ये जमिनीमध्ये गुंतवणूक संधी क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे ‘प्लॉट एक्स्पो’ च्या निमित्ताने उपलब्ध करून देण्यात आली होती. नाशिक आता चोहो बाजूला विस्तारत असल्याची प्रचिती या प्लॉट एक्स्पो ला मिळालेल्या प्रतिसादाने आली असल्याचे क्रेडाई नाशिक मेट्रोचे मानद सचिव तुषार संकलेचा म्हणाले
एक्स्पो यशस्वीतेसाठी क्रेडाई नाशिक मेट्रोचे आयपीपी कृणाल पाटील ,उपाध्यक्ष अनिल आहेर, अंजन भालोदिया, उदय घुगे ,कोषाध्यक्ष श्रेणिक सुराणा ,सहसचिव सचिन बागड,नरेंद्र कुलकर्णी ,ऋषिकेश कोते, हंसराज देशमुख तसेच समिती सदस्य अनंत ठाकरे ,विजय चव्हाणके ,सागर शाह ,निशित अटल ,सुशील बागड ,निरंजन शाह, वृषाली हिरे, दिपाली बिरारी, सहयोगी सदस्य सतीश मोरे, सुशांत गांगुर्डे ,अभिषेक महाजन, समीर सोनवणे आमंत्रित सदस्य मनोज लाडानी हर्षल हणमंते , शिवम पटेल, हिरेन भडजा मयुरेश चौधरी, ऋषभ जैन, क्रेडाई युवा विंग समन्वयक आदित्य भातंबरेकर, सहसमन्वयक अजिंक्य नहार हे प्रयत्नशील आहेत.