फक्त ४८ पैशात बनवा दर्जेदार व्हिडिओ...  भारताचे स्वतःचे 'वार्या' एआय मॉडेल लाँच...

Share:
Main Image
Last updated: 14-Jun-2026

 

 

 

नवी दिल्ली, (प्रतिनिधी) १४ जून २०२६

भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील स्वावलंबनाच्या दिशेने आज एक ऐतिहासिक पाऊल पडले आहे. केंद्र सरकारच्या 'इंडिया एआय मिशन'च्या पाठिंब्याने 'अवतार' (Avataar) या एआय-नेटिव्ह ट्रान्सफॉर्मेशन्स कंपनीने 'वार्या' (Varya) नावाचे संपूर्ण स्वदेशी बनावटीचे अत्याधुनिक व्हिडिओ स्टोरी जनरेटिंग एआय मॉडेल लाँच केले आहे.

नवी दिल्लीत आयोजित एका विशेष पत्रकार परिषदेत इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन आणि 'अवतार' कंपनीच्या प्रमुखांच्या उपस्थितीत या एआय प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला. हे मॉडेल भारतातील सर्वसामान्य नागरिक, शिक्षक आणि लघु उद्योजकांसाठी अत्यंत परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार आहे.

भारतीय संस्कृतीची अचूक जाण

'वार्या' हे केवळ पाश्चात्त्य तंत्रज्ञानाची नक्कल नसून, ते खास भारतासाठी डिझाइन करण्यात आले आहे. भारतातील विविध प्रदेश, सण, खाद्यसंस्कृती, पेहराव आणि दैनंदिन जीवन यांमधील सांस्कृतिक बारकाव्यांचे अचूक आकलन करून त्यानुसार व्हिडिओ तयार करण्याची क्षमता या मॉडेलमध्ये आहे. एखाद्या गावातील शिक्षकाला दृश्यात्मक धडा तयार करण्यापासून ते छोट्या उद्योजकांना (MSMEs) आपल्या उत्पादनांची जाहिरात बनवण्यापर्यंत, हे मॉडेल एका साध्या कल्पनेचे सुंदर चलचित्र कथेत (Video Story) रूपांतर करेल.

तंत्रज्ञानाचा चमत्कार: ५० स्टेप्सचे काम ४ स्टेप्समध्ये!

'वार्या' मॉडेलमध्ये एका विशेष डिस्टिलेशन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे व्हिडिओच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता, व्हिडिओ निर्मितीची प्रक्रिया ५० स्टेप्सवरून थेट ४ स्टेप्सवर आली आहे. यामुळे व्हिडिओ बनवण्याचा वेग प्रचंड वाढला आहे.

प्रमुख वैशिष्ट्ये एका नजरेत:

Advertisement

किंमत - केवळ ०.४८ (४८ पैसे) प्रति सेकंद (जागतिक मॉडेल्सपेक्षा १० पटीने स्वस्त).

तंत्रज्ञान - अत्याधुनिक डिस्टिल्ड व्हिडिओ मॉडेल (जलद आणि कार्यक्षम).

उपयोगकर्ते - शिक्षक, विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिक आणि एमएसएमई (MSME) उद्योग.

बॅकअप' इंडिया एआय मिशन'चे राष्ट्रीय कॉम्प्युट इन्फ्रास्ट्रक्चर आणि पाठबळ.

 

"भारताच्या एआय प्रवासातील हा एक महत्त्वाचा मैलाचा दगड आहे. 'वार्या' हे अशा देशांतर्गत संशोधन आणि क्षमता निर्मितीचे उत्तम उदाहरण आहे, ज्याला सरकार सक्षम करू इच्छिते."

एस. कृष्णन, सचिव, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय.

"१.४ अब्ज लोकसंख्या असलेल्या देशासाठी तंत्रज्ञान परवडणाऱ्या किमतीत असणे ही पूर्वअट आहे. 'वार्या'मुळे पुढील अब्जावधी कथा, जाहिराती आणि धडे एआयच्या माध्यमातून मोजक्या लोकांपर्यंत मर्यादित न राहता प्रत्येकाला बनवता येतील."

स्रवंथ अलुरु, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक, 'अवतार'.

 

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.