बूथ मजबूत तर संघटना मजबूत; SIR आढावा बैठकीत छगन भुजबळांचे मार्गदर्शन

Share:
Main Image
Last updated: 14-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १४ जून - भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार यादी पुनर्निरीक्षण (SIR) कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महत्त्वपूर्ण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मतदार यादी पुनर्निरीक्षण प्रक्रियेची माहिती, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी तसेच बूथ स्तरावरील नियोजन याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीस राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार दिलीप बनकर, आमदार नितीन पवार, आमदार सरोज आहिरे, माजी खासदार देविदास पिंगळे, जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधूने, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, माजी आमदार जयंत जाधव, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, नाना महाले,समाधान जेजुरकर,सर्व तालुकाध्यक्ष,विधानसभा अध्यक्ष आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ SIR मोहिमेचे महत्त्व अधोरेखित करताना  म्हणाले की,  "बूथ प्रमुख हा पक्ष संघटनेचा पाया असून निवडणूक व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचा दुवा आहे. बूथ स्तरावर सक्षम संघटना उभी राहिली तरच पक्षाची ताकद तळागाळापर्यंत पोहोचते ". मतदार यादी अचूक व अद्ययावत ठेवण्यासाठी पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच बूथ स्तरावरील यंत्रणा अधिक सक्षम करून पात्र मतदारांची नोंदणी, पडताळणी आणि जनजागृती प्रभावीपणे राबवावी

Advertisement

बैठकीत विशेष सखोल मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रमाच्या विविध टप्प्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मतदारांपर्यंत पोहोचून आवश्यक माहिती व सहकार्य उपलब्ध करून देण्यासाठी पक्ष संघटनेने नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी यावेळी SIR (Special Intensive Revision - विशेष सखोल मतदार यादी पुनर्निरीक्षण) मोहिमेचे स्वरूप, उद्दिष्टे आणि अंमलबजावणी प्रक्रिया याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मतदार यादी अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक ठेवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून राबविण्यात येणाऱ्या या विशेष मोहिमेत BLA (Booth Level Agent) यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे स्पष्ट करण्यात आले. प्रत्येक मतदान केंद्रासाठी पक्षाच्या वतीने BLA ची नियुक्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच BLA यांनी मतदार यादीची पडताळणी करणे, नव्या मतदारांची नोंदणी, स्थलांतरित अथवा वगळलेल्या मतदारांची माहिती संकलित करणे, बूथस्तरावर जनजागृती करणे आणि SIR प्रक्रियेत नागरिकांना आवश्यक सहकार्य करणे ही त्यांची प्रमुख जबाबदारी असल्याचे सांगण्यात आले. या सर्व बाबींचे प्रभावीपणे पालन करता यावे यासाठी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले.

Advertisement

Comments

No comments yet.