नाशिक, (प्रतिनिधी) १३ जून - नाशिक शहर व परिसरातील प्लॉटची माहिती एकाच ठिकाणी मिळण्यासाठी क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे पहिल्यांदाच ‘प्लॉट एक्स्पो’चे आयोजन करण्यात आले आहे. गोविंद नगर येथील मनोहर गार्डन (ट्रीट हॉटेल) येथे हा दोन दिवसीय प्लॉट एक्स्पो संपन्न होणार असून या एक्सपो मध्ये 10 लाखापासून पुढे प्लॉट्स उपलब्ध आहेत अशी माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी दिली. एक्स्पोबद्दल माहिती देताना समन्वयक भूषण कोठावदे म्हणाले,या प्रदर्शनामध्ये नाशिक शहर तसेच चांदशी, त्र्यंबक, घोटी, इगतपुरी, मखमलाबाद ,आडगाव, पाथर्डी, इंदिरानगर, म्हसरूळ, वडनेर, नांदूर नाका, औरंगाबाद रोड, नाशिक रोड, ओझर या भागातील प्लॉट्स येथे उपलब्ध असून प्लॉट खरेदी तसेच घर बांधण्यासाठी अर्थसाहयाचे मार्गदर्शन देखील येथे करण्यात येईल.
प्लॉट एक्स्पोचे सहसमन्वयक श्याम साबळे म्हणाले, प्रदर्शनाची वेळ सकाळी 10 ते ते 8.30 अशी असून नाशिकच्या नियोजित वाढीचा आणि भविष्यकालीन संधींचा वेध घ्यायचा असेल तर हा एक्स्पो नक्कीच एक महत्वपूर्ण व्यासपीठ ठरेल. क्रेडाई एक्स्पो कमिटी प्रमुख मनोज खिवसरा यांनी निवासी, औद्योगिक व्यावसायिक, फार्म हाऊस आणि व्हिला प्लॉट्सच्या अनेक पर्यायांसाठी एक्सपोला भेट द्यायचे आवाहन करतानाच एक्सपोच्या माध्यमातून एकाच छताखाली विश्वासार्ह, पारदर्शक आणि सुव्यवस्थित व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा उद्देश असल्याचे नमूद केले. क्रेडाई नाशिक मेट्रोचे मानद सचिव तुषार संकलेचा यांनी नाशिकमधील प्लॉटसमध्ये गुंतवणुकीच्या सुवर्णसंधीचा नाशिककरांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.
एक्स्पो यशस्वीतेसाठी क्रेडाई नाशिक मेट्रोचे आयपीपी कृणाल पाटील ,उपाध्यक्ष अनिल आहेर, अंजन भालोदिया, उदय घुगे ,कोषाध्यक्ष श्रेणिक सुराणा ,सहसचिव सचिन बागड,नरेंद्र कुलकर्णी ,ऋषिकेश कोते, हंसराज देशमुख तसेच समिती सदस्य अनंत ठाकरे ,विजय चव्हाणके ,सागर शाह ,निशित अटल ,सुशील बागड ,निरंजन शाह, वृषाली हिरे, दिपाली बिरारी, सहयोगी सदस्य सतीश मोरे, सुशांत गांगुर्डे ,अभिषेक महाजन, समीर सोनवणे आमंत्रित सदस्य मनोज लाडानी हर्षल हणमंते , शिवम पटेल, हिरेन भडजा मयुरेश चौधरी, ऋषभ जैन, क्रेडाई युवा विंग समन्वयक आदित्य भातंबरेकर, सहसमन्वयक अजिंक्य नहार हे प्रयत्नशील आहेत.