राज्यातील सर्व क्रीडांगणांवर मिळणार या सर्व सुविधा... उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा पुढाकार...

Share:
Main Image
Last updated: 04-Jun-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ४ जून - महाराष्ट्रातील महिला खेळाडू विविध क्रीडा प्रकारांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्याचा नावलौकिक उंचावत आहेत. त्यांना मैदानांवर अधिक सुरक्षित, सन्मानजनक आणि प्रोत्साहनपर वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील क्रीडांगणांच्या विकासासोबतच प्रत्येक क्रीडांगणावर मॉडेल स्वच्छतागृहे, पुरेशी प्रकाशयोजना, स्वतंत्र चेंजिंग रूम आणि सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याबाबत 'राज्यस्तरीय एकसंध धोरण' तयार करण्यात यावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा क्रीडामंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले. २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यातील क्रीडांगणांवर महिला खेळाडूंसाठी स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत विचारण्यात आलेल्या तारांकित प्रश्नावरील आश्वासनाच्या अनुषंगाने सह्याद्री अतिथीगृह येथे एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

 उच्चस्तरीय बैठकीत महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार चित्रा वाघ, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा, क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल (व्हीसीद्वारे), क्रीडा व युवक सेवा आयुक्त दीपक सिंगला आणि बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नव्या क्रीडा धोरणात 'खेळाडूधार्जिणा' दृष्टिकोन
बैठकीत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, "महाराष्ट्र शासनाने क्रीडा क्षेत्रात व्यापक सुधारणा करण्याचा निर्धार केला असून नव्या क्रीडा धोरणाद्वारे खेळाडूकेंद्रित दृष्टिकोन स्वीकारला आहे. ग्रामीण भागापासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत खेळाडूंना संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. महिला खेळाडूंना क्रीडांगणांवर आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्यास त्यांच्या सहभागात आणि कामगिरीत अधिक सुधारणा होईल."

Advertisement

क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी ५ सूत्री कार्यक्रम
क्रीडा क्षेत्राला खऱ्या अर्थाने उभारी देण्यासाठी केवळ मैदान नव्हे, तर सक्षम पायाभूत सुविधांची गरज असल्याचे सांगत उपमुख्यमंत्र्यांनी पुढील बाबींवर भर दिला:
१. सक्षम पायाभूत सुविधा आणि सुरक्षित वातावरण
२. दर्जेदार प्रशिक्षण व्यवस्था व प्रशिक्षकांचे योग्य मार्गदर्शन
३. खेळाडूंना आवश्यक आर्थिक पाठबळ
४. योग्य पोषण (Nutrition)
५. सामाजिक स्वीकार आणि महिलांचा सन्मान

राज्यातील सर्व क्रीडांगणांवर महिला खेळाडूंसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, तसेच याचा एक ठोस कृती आराखडा (Action Plan) तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.