जिओचा मोठा धमाका... अवघ्या १२३ रुपयांचा प्लॅन... डेटासह अमर्याद कॉलिंग आणि ३०० एसएमएस...

Share:
Main Image
Last updated: 03-Jun-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ३ जून - देशातील ४जी फिचर फोन (4G Feature Phone) वापरकर्त्यांना डिजिटल कनेक्टिव्हिटीशी जोडण्यासाठी रिलायन्स जिओने (Jio) आणखी एक मोठे आणि आक्रमक पाऊल उचलले आहे. कंपनीचा अत्यंत लोकप्रिय आणि परवडणारा ₹१२३ चा प्रीपेड प्लॅन आता बाजारातील सर्वच प्रमुख ४जी फिचर फोनवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. या प्लॅनच्या माध्यमातून ग्राहकांना स्वस्त दरात डेटा आणि अमर्याद कॉलिंगची सुविधा मिळणार आहे.

१४ जीबी डेटा आणि बरेच काही...
जिओच्या या ₹१२३ च्या प्लॅनमध्ये ग्राहकांना महिनाभरासाठी एकूण १४ जीबी (GB) डेटा मिळणार आहे. यासोबतच देशांतर्गत कोणत्याही नेटवर्कवर अमर्याद व्हॉइस कॉलिंग (Unlimited Calling) आणि ३०० एसएमएस (SMS) चा लाभ घेता येईल. हा प्लॅन देशातील फिचर फोन वापरकर्त्यांना सर्वात स्वस्त दरात कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देणारा ठरत आहे.

Advertisement

 'या' सर्व प्रमुख ४जी फिचर फोन ब्रँड्सवर मिळणार लाभ:
हा प्लॅन केवळ जिओच्या फोनपुरता मर्यादित नसून, बाजारातील इतर सर्व आघाडीच्या कंपन्यांच्या ४जी फिचर फोनवर वापरता येईल:
जिओभारत (JioBharat)
नोकिया (Nokia)
लावा (Lava)
एचएमडी (HMD)
आयटेल (Itel)
कार्बन (Karbonn)

वर्षाला तब्बल १,००० रुपयांची बचत!
सध्या टेलिकॉम बाजारात इतर कंपन्यांचे फिचर फोनसाठीचे बेसिक प्लॅन्स महिनाभऱ्यासाठी सुमारे ₹१९९ च्या घरात आहेत. त्यांच्या तुलनेत जिओचा हा प्लॅन तब्बल ७६ रुपयांनी स्वस्त आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, इतर कंपन्यांच्या प्लॅनच्या तुलनेत जिओचा हा पर्याय निवडल्यास ग्राहकांची वर्षाला जवळपास ₹१,००० पर्यंत मोठी बचत होऊ शकते.
भारतातील आजही एक मोठा वर्ग फिचर फोन वापरत असून, त्यांना इंटरनेटच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि डिजिटल इंडियाला गती देण्यासाठी जिओचा हा नवीन प्लॅन गेमचेंजर ठरू शकतो, असा अंदाज बाजार विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

Comments

No comments yet.