एसएमबीटी 'कॉलेज ऑफ फार्मसी'त आधुनिक संशोधनासह १००% प्लेसमेंटस

Share:
Main Image
Last updated: 03-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ३ जून - संशोधन क्षेत्रातील नावीन्यपूर्ण कामगिरी, जागतिक दर्जाचे शैक्षणिक कोलॅबोरेशन आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या त्रिसूत्रीच्या जोरावर एसएमबीटी 'कॉलेज ऑफ फार्मसी'ने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. विद्यार्थ्यांच्या संशोधनासाठी वाव देत जागतिक पातळीवर एक्स्पोजर मिळवून देण्यासाठी हे महाविद्यालय एक प्रगत व्यासपीठ ठरले आहे. 

या महाविद्यालयाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कॅम्पसमध्येच उपलब्ध असलेले तब्बल १२०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय! यामुळे येथील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष रुग्ण सेवा आणि क्लिनिकल फार्मसीचा व्यावहारिक अनुभव मिळत आहे. उत्तम दर्जाच्या संशोधनासाठी महाविद्यालयात 'स्टेट ऑफ द आर्ट' रिसर्च लॅबोरेटरी आणि सोफिस्टिकेटेड ॲनालिटिकल इन्स्ट्रुमेंट्सची सुविधा आहे. या समृद्ध शैक्षणिक वातावरणामुळेच प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी ५०० पेक्षा अधिक रिसर्च पेपर्स प्रसिद्ध केले आहेत. यामध्ये फार्मसी विभागाच्या वतीने दरवर्षी तब्बल १०० ते १५० शोधनिबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर नामांकित जर्नल्समध्ये प्रकाशित केले जातात. महाविद्यालयाच्या नावावर ५०० हून अधिक पब्लिकेशन्स, ७० पेक्षा अधिक स्कोपस (Scopus) आर्टिकल्स प्रसिद्ध झाले आहेत. विशेष म्हणजे चालू वर्षी २०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी संशोधन कार्य पूर्ण केले आहे. संशोधन कार्यास वाव मिळावा म्हणून यावर्षी २० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध शोधनिबंध प्रसिद्ध करून पारितोषिके पटकावली आहेत.  तसेच ३० हून अधिक पेटंट्सची नोंददेखील झाल्यामुळे संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवण्यात यश आले आहे. 

विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी गेल्या २० वर्षांपेक्षा अधिक काळ या महाविद्यालयाने हजारो विद्यार्थी घडवले आहेत. आज जगाच्या कानाकोपऱ्यात हे विद्यार्थी उल्लेखनीय कामगिरी करत असल्याचे विभागप्रमुख कुंदन तिवारी यांनी सांगितले. ते म्हणाले,  जगभरातील १० पेक्षा अधिक परदेशी संस्थांशी सामंजस्य करार (Foreign Collaborations) करण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने थायलंड, युएई, मलेशिया, इंडोनेशिया, नेपाळ, श्रीलंका, फिलीपिन्स आणि व्हिएतनाम या देशांमधील ९ नामांकित आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचा समावेश आहे. या करारांतर्गत विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय स्टडी टूरचे आयोजन केले जाते. विशेष म्हणजे, या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना आर्थिक हातभार आणि विशेष स्कॉलरशिप देखील दिली जाते.

हे महाविद्यालय उच्च शिक्षणाचे एक अग्रगण्य केंद्र बनले असून येथे मान्यताप्राप्त पीएचडी (Ph.D.) सेंटर आहे. महाविद्यालयातील १३ पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक स्वतः पीएचडी धारक असून ते मार्गदर्शक (Guides) म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय, विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या 'जीपॅट' (GPAT) आणि 'नायपर' (NIPER) या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षांची संपूर्ण तयारी महाविद्यालयातच करून घेतली जाते. विद्यार्थी केंद्रित शिक्षण (Student-Centric Education) देत असतानाच त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी सायको-सोशल सपोर्ट आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी ट्रेनरसह हाय-क्वालिटी जिम, झुंबा, योगा आणि २४ तास स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची सुविधा उपलब्ध आहे. कॅम्पसमध्ये भव्य क्रिकेट ग्राउंड देखील आहे.  

Advertisement

महाविद्यालयाचे हॉस्टेल सर्व सोयींनी युक्त असून, रात्रीच्या अभ्यासासाठी 'नाईट लायब्ररी'ची विशेष सुविधा आहे. ग्रंथालयात १० हजारांहून अधिक पुस्तके उपलब्ध आहेत. संपूर्ण कॅम्पस पर्यावरणपूरक, 'प्लास्टिक आणि व्हेईकल फ्री' असून अंतर्गत दळणवळणासाठी बॅटरी ऑपरेटेड बग्गी आणि सायकल फॅसिलिटी दिली आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सामाजिक जाणीव देखील रुजवली जात असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो.

चौकट
सक्षम संशोधक घडविण्यासाठी प्रयत्न
परदेशी विद्यापीठांसोबतच्या करारांमुळे आमच्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण पद्धती प्रत्यक्ष अनुभवता आली. हा अनुभव त्यांच्या करिअरला एक नवी आणि सक्षम दिशा देणारा ठरत आहे. आम्ही केवळ संशोधन करत नसून, जागतिक आव्हानांना तोंड देऊ शकतील असे सक्षम संशोधक घडवत आहोत.
डॉ. योगेश उशीर, 
प्राचार्य, कॉलेज ऑफ फार्मसी

१००% प्लेसमेंटची परंपरा
या सर्व सोयी-सुविधा आणि दर्जेदार शिक्षणामुळेच महाविद्यालयाने गेल्या काही वर्षांत १००% प्लेसमेंटची (100% Placement) उज्ज्वल परंपरा कायम ठेवली आहे. नामांकित कंपन्यांमधील इंडस्ट्रियल टाय-अप आणि रिक्रुटमेंट ड्राईव्हच्या माध्यमातून येथील विद्यार्थ्यांना किमान साडेतीन लाख रुपये ते कमाल ९ लाख रुपये प्रति वर्ष या सुरुवातीच्या पॅकेजने मोठ्या पदांवर नियुक्त केले गेले आहेत. 
प्राजक्ता शिंदे  
प्लेसमेंट ऑफिसर, एसएमबीटी कॉलेज ऑफ फार्मसी

उच्च शिक्षण, राष्ट्रीय परीक्षांची तयारी आणि स्टार्टअप्स
शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष इंडस्ट्रियल एक्स्पोजर दिले जाते. यामध्ये प्रामुख्याने हर्बल फॉर्म्युलेशन डेव्हलपमेंट आणि 'स्टार्टअप इन फार्मसी' अंतर्गत प्रत्यक्ष उद्योजकतेचे धडे दिले जातात. सध्या महाविद्यालयात ३ नावीन्यपूर्ण स्टार्टअप्सवर काम सुरू असून, संशोधनासाठी महत्त्वाची मानली जाणारी 'झेब्रा फिश स्टडी सेटअप' प्रणाली देखील येथे कार्यान्वित आहे. तसेच सुसज्ज हर्बल गार्डनमध्ये ३०० पेक्षा अधिक विविध औषधी वनस्पतींच्या प्रजातींची जोपासना करण्यात आली आहे.

Comments

No comments yet.