त्या पीक विम्याची फेर तपासणी करा... कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आदेश...

Share:
Main Image
Last updated: 04-Jun-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ४ जून - प्रधानमंत्री पीक विमा योजनेत तांत्रिक त्रुटींमुळे नाकारण्यात आलेल्या नुकसान भरपाईच्या प्रकरणांची तातडीने फेर तपासणी करून त्याचा सविस्तर अहवाल सादर करावा, असे कडक निर्देश कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. चंद्रपूर जिल्हा आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित पीक विमा प्रकरणांबाबत मंत्रालयात आयोजित एका विशेष बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला आमदार सुधीर मुनगंटीवार, कृषी सचिव परिमल सिंह, उपसचिव प्रतिभा पाटील आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही!
कृषीमंत्री भरणे यांनी स्पष्ट केले की, राज्य शासनाने शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या लाभापासून राज्यातील एकही पात्र शेतकरी वंचित राहता कामा नये. केवळ तांत्रिक कारणांमुळे ज्या शेतकऱ्यांचे दावे नाकारले गेले आहेत, त्यांना न्याय मिळणे अत्यंत आवश्यक आहे. प्रशासनाने यासाठी विशेष प्रयत्न करावेत आणि पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

Advertisement

शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या समस्यांवर सकारात्मक मार्ग
याच बैठकीत कृषीमंत्र्यांनी राज्यातील विविध शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रलंबित मागण्या आणि अडचणींचाही आढावा घेतला. यामध्ये:
गडचिरोली येथील झाडीपट्टी शेतकरी उत्पादक कंपनी
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील ग्रीन ॲम्बीशन शेतकरी उत्पादक कंपनी आणि शिवसुदर्शन शेतकरी उत्पादक कंपनी
या शेतकरी कंपन्यांच्या विविध समस्या आणि अडचणींवर सकारात्मक मार्ग काढून त्यावर तातडीने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देशही मंत्री भरणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.