'नेक्स्ट जेन टियागो' आणि 'टियागो इव्ही' लॉन्च... हॅचबॅक श्रेणीत प्रथमच ३६०° कॅमेरा, बॅटरीवर 'लाइफटाईम वॉरंटी'... एवढी आहे किंमत...

Share:
Main Image
Last updated: 30-May-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ३० मे - भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी 'टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स'ने (TMPV) गुरुवारी आपली बहुप्रतिक्षित 'नेक्स्ट जेन टियागो' (Next Gen Tiago) आणि 'टियागो.इव्ही' (Tiago.ev) भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली. ७ लाखांहून अधिक ग्राहकांचा विश्वास असलेल्या टियागोचा हा नवा अवतार पेट्रोल, आयसीएनजी (iCNG) आणि इलेक्ट्रिक (EV) अशा तीनही इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. याच्या पेट्रोल आवृत्तीची किंमत अवघ्या ४.६९ लाख रुपयांपासून, तर इलेक्ट्रिक आवृत्तीची किंमत ६.९९ लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. हॅचबॅक कार घेणाऱ्या ग्राहकांच्या अपेक्षा उंचावणारी ही कार आधुनिक डिझाईन, प्रगत तंत्रज्ञान आणि मजबूत सुरक्षा पॅकेजचा उत्तम संगम मानली जात आहे.

आकांक्षांचे खऱ्या अर्थाने लोकशाहीकरण: शैलेश चंद्रा

टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) शैलेश चंद्रा यांनी या सादरीकरणाबाबत सांगितले की, "लाखो भारतीय कुटुंबांसाठी हॅचबॅक कार आजही वैयक्तिक प्रवासाची पहिली पसंती आहे. मात्र, दीर्घकाळापासून या श्रेणीकडे वाहन उद्योगाचे दुर्लक्ष झाले होते. 'नेक्स्ट जेन टियागो' ही उणीव भरून काढेल. पूर्वी केवळ महागड्या कार्सपुरती मर्यादित असलेली प्रीमियम वैशिष्ट्ये आता सामान्य हॅचबॅक कारच्या मालकाला सहज उपलब्ध होतील."

'नेक्स्ट जेन टियागो'ची ५ 'वॉव' वैशिष्ट्ये:

१. वॉव लुक्स आणि प्रीमियम इंटीरियर: कारचे बाह्य रूप लक्षणीयरीत्या अद्ययावत करण्यात आले असून अंतर्गत भागात कमालीचा प्रीमियम अनुभव देण्यात आला आहे.

२. वॉव टेक (३६०° सराउंड व्ह्यू): हॅचबॅक श्रेणीत पहिल्यांदाच 'ब्लाईंड व्ह्यू मॉनिटर'सह ३६०° सराउंड व्ह्यू कॅमेरा सिस्टीम सारखे प्रगत कनेक्टेड तंत्रज्ञान देण्यात आले आहे.

३. वॉव चॉइसेस: ग्राहकांना पेट्रोल, स्मार्ट आयसीएनजी आणि इलेक्ट्रिक (ईव्ही) असे तीनही पर्याय एकाच डिझाईनमध्ये मिळतील.

Advertisement

४. वॉव सेफ्टी: सुरक्षेला चैनीची वस्तू न मानता एक अपरिहार्य गरज मानून यात अधिक मजबूत सुरक्षा पॅकेज देण्यात आले आहे.

५. वॉव इकॉनॉमिक्स (किफायतशीर खर्च): कारची किंमत सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी ठेवण्यात आली आहे.

'टियागो.इव्ही' बदलणार इलेक्ट्रिक वाहनांचे आर्थिक गणित!

इलेक्ट्रिक व्हेईकल श्रेणीमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टाटा मोटर्सने मोठी खेळी खेळली आहे. टियागो.इव्हीच्या माध्यमातून खालील विशेष फायदे दिले जाणार आहेत:

लाइफटाईम बॅंटी वॉरंटी : ऑटोमोबाईल क्षेत्रात पहिल्यांदाच ईव्हीच्या हाय-व्होल्टेज (HV) बॅटरीवर 'लाइफटाईम वॉरंटी' दिली जात आहे.

सुपरफास्ट चार्जिंग : अवघ्या १८ मिनिटांच्या चार्जिंगमध्ये ही कार १०० किलोमीटरची रेंज देईल.

किंमत वसुली : दैनिका खर्चातील प्रचंड बचतीमुळे अवघ्या ४ ते ५ वर्षांत या कारची संपूर्ण किंमत वसूल होईल, असा कंपनीचा दावा आहे.

१२ लाख रुपयांपेक्षा कमी बजेट असलेल्या आणि ईव्हीचा वापर सध्या २ टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या या श्रेणीत टाटाची ही नवी कार गेमचेंजर ठरेल, असा विश्वास उद्योग जगतातून व्यक्त होत आहे.

Advertisement

Comments

No comments yet.