मुंबई, (प्रतिनिधी) २० मे - स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटपाचे सूत्र अखेर निश्चित झाले आहे. महायुतीमध्ये कमालीच्या राजकीय तडजोडी पाहायला मिळत असून, जागावाटप जाहीर होताच तातडीने उमेदवारही जाहीर केले जाणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी १ जून ही शेवटची मुदत असल्याने राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. दरम्यान, या जागावाटपात अहिल्यानगरची जागा भाजपच्या पदरात पडली असून, पुण्याच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राज्य मंत्रिमंडळातील एका महत्त्वाच्या खात्यावर तडजोड केल्याची खात्रीलायक माहिती आहे.
'पुणे' राष्ट्रवादीकडे, पण अर्थखात्यावर पाणी?
महायुतीच्या अंतर्गत गोटातून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे आणि कोकण या दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) देण्यात येणार आहेत. मात्र, पुण्याच्या या प्रतिष्ठेच्या जागेसाठी राष्ट्रवादीला मोठी राजकीय किंमत मोजावी लागल्याची चर्चा आहे. या बदल्यात मंत्रिमंडळातील एका अत्यंत महत्त्वाच्या खात्याची तडजोड झाली असून, राष्ट्रवादीने आपल्याकडील 'अर्थखात्या'वरील (Finance Ministry) दावा सोडण्यास संमती दिल्याचे खात्रीशिररीत्या समजते.
महायुतीचे जागावाटप: भाजपला सिंहाचा वाटा
एकूण १७ जागांपैकी १६ जागांवर महायुतीचे एकमत झाले असून, छत्रपती संभाजीनगरच्या एका जागेवर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. जागांचे संख्याबळ पुढीलप्रमाणे आहे: