मुतखडा अन् प्रोस्टेटच्या शस्त्रक्रिया आता विना चिरा, विना वेदना... 'एसएमबीटी'मध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात प्रगत लेझर मशीन दाखल...

Share:
Main Image
Last updated: 28-May-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २८ मे - वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे कौशल्य यांच्या बळावर नाशिकच्या एसएमबीटी (SMBT) हॉस्पिटलने उत्तर महाराष्ट्रात सुपर स्पेशालिटी उपचारांचे एक नवे पर्व सुरू केले आहे. हॉस्पिटलचा मूत्ररोग (Urology) विभाग हलाखीच्या अवस्थेत आलेल्या रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. याठिकाणी अतिशय क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या जात असून, या सर्व शस्त्रक्रिया शासकीय योजनेअंतर्गत मोफत होत आहेत. यामुळे आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना जागतिक दर्जाचे उपचार मिळणे शक्य झाले असल्याची माहिती मूत्ररोग विभाग प्रमुख आणि प्रसिद्ध मूत्रविकार तज्ज्ञ डॉ. नरसिंग माने यांनी दिली.

६०W थुलियम लेझर तंत्रज्ञान दाखल

मूत्ररोग विभागात नुकतेच उत्तर महाराष्ट्रातील सर्वात अद्ययावत असे '60W थुलियम लेझर' (60W Thulium Laser) मशीन दाखल झाले आहे, जे 'लेझर प्रोस्टेट' शस्त्रक्रिया करण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे. या प्रगत तंत्रज्ञानामुळे शरीरावर कोणताही काप किंवा चिरा देण्याची गरज भासत नाही. संपूर्णपणे दुर्बिणीद्वारे आणि लेझरच्या साहाय्याने मुतखड्याचे (Kidney Stone) बारीक कण करून ते शरीराबाहेर काढले जातात. यामुळे रुग्णाला कोणताही रक्तस्त्राव किंवा वेदना जाणवत नाहीत आणि अवघ्या दुसऱ्याच दिवशी रुग्णाला डिस्चार्ज मिळू शकतो.

किडनी ट्रान्सप्लांट आणि कॅन्सर उपचारात उत्तम सक्सेस रेट

१७ हून अधिक किडनी ट्रान्सप्लांट यशस्वी: किडनी निकामी झालेल्या रुग्णांना नवजीवन देण्यासाठी एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये राबवला जाणारा 'किडनी ट्रान्सप्लांट' उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला असून, डॉ. माने यांच्या टीमने वर्षभरात १७ हून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत.

क्लिष्ट आजारांवर एकाच छताखाली उपचार: प्रोस्टेट ग्रंथी वाढणे (BPH), युरो-कॅन्सर, महिलांमधील मूत्रविकार, पुरुषांमधील वंध्यत्व व लैंगिक समस्या (Andrology) आणि लहान मुलांमधील जन्मजात मूत्रविकारांवर येथे यशस्वी उपचार केले जातात.

तज्ज्ञांची मोठी फौज: रुग्णालयात ३७० पेक्षा अधिक तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आणि शस्त्रक्रियेनंतर देखभालीसाठी २४ तास प्रशिक्षित सपोर्टिंग स्टाफ उपलब्ध आहे.

लेझर सर्जरीचे रुग्णांना होणारे प्रमुख फायदे:

शरीरावर कोणताही टाका किंवा डाग पडत नाही.

Advertisement

इन्फेक्शन (संसर्ग) होण्याचा धोका अत्यंत कमी.

सुरक्षित, अचूक उपचार पद्धती आणि पैशांची व वेळेची मोठी बचत.

गरजू रुग्णांची गैरसोय टळली!

या सुविधेमुळे नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्र, ठाणे, पालघर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, बीड आणि धाराशिव परिसरातील रुग्णांची मोठी गैरसोय टळली आहे.

रुग्णकेंद्रित आरोग्यसेवेवर आमचा भर!

"आमचा उद्देश रुग्णांना कमीत कमी वेदना आणि जास्तीत जास्त अचूकतेसह उपचार देणे हा आहे. नवीन लेझर मशीनमुळे अत्यंत कठीण जागी असलेले खडे देखील आम्ही सहज काढू शकत आहोत. किडनी ट्रान्सप्लांटपासून ते युरो-कॅन्सरपर्यंतच्या सर्व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया आता एसएमबीटीमध्ये पूर्ण विश्वासाने केल्या जातात."

- डॉ. नरसिंग माने (विभागप्रमुख व मूत्ररोग तज्ज्ञ, एसएमबीटी हॉस्पिटल)

शासकीय योजनेतून मोफत उपचार

"आर्थिक परिस्थितीअभावी कोणाचेही उपचार थांबू नयेत, ही आमची भूमिका आहे. याठिकाणी बहुतांश शस्त्रक्रिया 'आयुष्मान भारत' योजनेअंतर्गत मोफत केल्या जातात. योजनेत न बसणाऱ्या शस्त्रक्रियांसाठीही ऑपरेशन, डॉक्टर, भूलतज्ज्ञ आणि नर्सिंग चार्जेससह जेवण सर्व मोफत असून केवळ औषधांच्या खर्चात रुग्णांवर उपचार केले जातात."

- सचिन बोरसे (संचालक, आरोग्यसेवा, एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट)

Comments

No comments yet.