जिओचा नवा धमाका... अवघ्या २०० रु.मध्ये मिळणार १५ 'OTT' प्लॅटफॉर्म्स आणि 30GB डेटा...

Share:
Main Image
Last updated: 27-May-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २७ मे - वेगवेगळ्या ओटीटी (OTT) अॅप्सच्या महागड्या सबस्क्रिप्शन आणि वारंवार रिचार्ज करण्याच्या त्रासापासून ग्राहकांना मोठा दिलासा देणारी योजना रिलायन्स जिओने आणली आहे. कंपनीने अवघ्या ₹२०० किमतीचा नवीन 'Jio OTT Pass' लॉन्च केला असून, या एकाच पॅकमध्ये ग्राहकांना तब्बल १५ प्रीमियम OTT अॅप्स, १००० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल्स, ३०GB हाय-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड ५G इंटरनेट सुविधा मिळणार आहे. या विशेष पॅकची वैधता २८ दिवसांची असेल.

यूट्यूब प्रीमियम आणि प्राईम व्हिडिओचाही समावेश

जिओच्या या नव्या पासमध्ये डिजिटल विश्वातील सर्वात लोकप्रिय प्लॅटफॉर्म्सचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने:

मुख्य आकर्षण: यूट्यूब प्रीमियम (YouTube Premium), जिओहॉटस्टार मोबाईल + हॉलीवूड (JioHotstar Mobile + Hollywood) आणि प्राइम व्हिडिओ मोबाईल एडिशन (Prime Video Mobile Edition).

जिओटीव्ही (JioTV) मार्फत मिळणारे इतर १२ ओटीटी: सोनीलिव्ह (SonyLIV), झी५ (Zee5), लायन्सगेट प्ले, डिस्कव्हरी+, सन NXT, फॅनकोड, कांचा लंका, प्लॅनेट मराठी, चौपाल, होईचोई, टाइम्सप्ले आणि तरंग प्लस.

Advertisement

१००० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल्सची मेजवानी

ओटीटी प्लॅटफॉर्म्ससोबतच ग्राहकांना जिओटीव्हीवर १००० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल्सही मोफत पाहता येणार आहेत. यामध्ये स्टार, सोनी, सन टीव्ही आणि डिस्कव्हरी नेटवर्कवरील विविध मनोरंजन, चित्रपट, क्रीडा (स्पोर्ट्स) आणि प्रादेशिक भाषांमधील नामांकित चॅनेल्सचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे ग्राहकांचे मनोरंजनाचे बजेट कमालीचे कमी होणार आहे.

'Jio OTT Pass' कसा अॅक्टिव्ह करायचा?

पहिली अट: या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांच्या मोबाईलवर आधीपासूनच एखादा 'जिओ बेस प्लॅन' (Jio Base Plan) सक्रिय असणे आवश्यक आहे.

अशी करा खरेदी: बेस प्लॅन अॅक्टिव्ह असल्यास ग्राहक MyJio अॅप, Jio.com ही अधिकृत वेबसाइट, जिओचे अधिकृत रिटेल स्टोअर्स किंवा इतर कोणत्याही रिचार्ज अॅप्सद्वारे अवघ्या ₹२०० चा 'Jio OTT Pass' त्वरित अॅक्टिव्ह करू शकतात.

एकाच रिचार्जमध्ये डिजिटल मनोरंजन, लाईव्ह टीव्ही आणि भरपूर इंटरनेट डेटा मिळवू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी जिओचा हा नवा पास बाजारात गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे.

Comments

No comments yet.