मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराला मिळणार नवं रूप... सुशोभीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन... बघा, असा असेल मंदिर परिसर...

Share:
Main Image
Last updated: 27-May-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २७ मे - मुंबईचे आराध्य दैवत असलेल्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराच्या परिसराचा कायापालट होणार आहे. मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांना अधिक सुलभ, जलद आणि प्रसन्न वातावरणात दर्शन घेता यावे, यासाठी हाती घेण्यात आलेल्या मंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पाच्या पूर्णत्वामुळे सिद्धिविनायक मंदिराला एक नवा आणि भव्य चेहरा मिळणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये:

सुविधांवर भर: देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता, त्यांना कमीत कमी वेळेत आणि सुलभपणे दर्शन मिळावे, हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

पायाभूत सुविधा: मंदिर परिसरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यात येणार असून, सुशोभीकरणाद्वारे परिसर अधिक नीटनेटका व भाविकांसाठी सुखद करण्यात येणार आहे.

Advertisement

भूमिपूजन प्रसंगी मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदानंद शंकर सरवणकर, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार प्रसाद लाड, महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी आणि मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांच्यासह न्यासाचे सर्व विश्वस्त उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन:

"सिद्धिविनायक मंदिर हे केवळ भाविकांचे श्रद्धास्थान नाही, तर ते मुंबईची ओळख आहे. या सुशोभीकरण प्रकल्पामुळे केवळ दर्शनाची प्रक्रिया सुलभ होणार नाही, तर मंदिर परिसराचे वातावरण अधिक प्रसन्न आणि भक्तीमय होईल," असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

?s=20

Comments

No comments yet.