'कॉकरोच'ची वेबसाईट तातडीने बंद, मग पेपरफुटीच्या 'टेलिग्राम' ऍपवर कारवाई का नाही? राघव चढ्ढा यांची यंदा चुप्पी का?

Share:
Main Image
Last updated: 25-May-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २५ मे - नीट (NEET) परीक्षेच्या फेरपरीक्षेच्या तोंडावर पुन्हा एकदा प्रश्नपत्रिका फुटीच्या अफवांनी आणि सायबर गुन्हेगारांनी जोर धरला आहे. टेलिग्राम ऍपवरून १० लाख रुपयांना प्रश्नपत्रिका विक्रीचा दावा करत विद्यार्थ्यांची लूट केली जात असल्याचे समोर आले आहे. एकीकडे सरकारी धोरणांविरोधात आवाज उठवणारी 'कॉकरोच जनता पार्टी'ची वेबसाईट आणि सोशल मीडिया अकाउंट तातडीने बंद केले जातात, तर दुसरीकडे थेट गुन्हेगारी कृत्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या 'टेलिग्राम'वर कारवाई का होत नाही? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.

१० लाखांचे 'प्रश्नपत्रिका' पॅकेज
अहमदाबादमध्ये शुभम ठाकर यांच्या तक्रारीवरून सायबर क्राईम शाखेने या रॅकेटचा तपास सुरू केला आहे. या टोळीने टेलिग्रामवर 'लीक पेपर', 'गॅरंटी सिलेक्शन' अशा नावाने ग्रुप्स तयार केले आहेत. सुरुवातीला २०० ते ५०० रुपयांपासून सुरू होणारा हा प्रवास अखेरीस १० लाख रुपयांच्या 'टोकन'पर्यंत पोहोचतो. आतापर्यंत या टोळीने तब्बल ५.७४ कोटी रुपयांहून अधिक रक्कम विद्यार्थ्यांकडून उकळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Advertisement

राजकीय मौन आणि 'राघव चड्ढा' फॅक्टर
दोन वर्षांपूर्वी नीट पेपरफुटीचा मुद्दा संसदेत उचलून सरकारला धारेवर धरणारे खासदार राघव चड्ढा सध्या या विषयावर पूर्णपणे गप्प आहेत. त्यावेळी आम आदमी पक्षात असताना 'इंडियन पेपर लीक' अशी टीका करणारे चड्ढा आता भाजपमध्ये आहेत. भाजपमध्ये प्रवेश केल्यावर त्यांना 'राज्यसभेतील याचिका समिती'चे अध्यक्षपद मिळाले आहे. आता या पदावरून ते तरुणाईचे प्रश्न आणि पेपरफुटीसारख्या गंभीर प्रकरणांवर नेमकी काय भूमिका घेतात, याकडे देशातील लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

तपास आणि संशय:
हा प्रकार केवळ सायबर फ्रॉड (फसवणूक) आहे की परीक्षा प्रणाली उद्ध्वस्त करण्याचा एखादा मोठा कूटनीतिक कट (Conspiracy), या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत. मात्र, सोशल मीडियाच्या वापराबाबतच्या दुटप्पी धोरणाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Comments

No comments yet.