अवकाळी पावसामुळे नुकसान... भुजबळांच्या नेतृत्वात वैद्यकीय मदत कक्षाद्वारे जखमींच्या उपचाराचा खर्च... नुकसानग्रस्त घरांची तातडीने दुरुस्तीही...

Share:
Main Image
Last updated: 23-May-2026

येवला, (प्रतिनिधी) २३ मे - येवला तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस व वादळामुळे घरांचे, सोलर, जनावरे शेड, कांदा चाळी, कांदा, केळी यासह शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत उपलब्ध करून दिली जाईल अशी माहिती माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिली.

राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार आज माजी खासदार समीर भुजबळ यांनी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या अंदरसुल, बोकटे, देवळाणे भागाची पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याबाबत आश्वस्त केले. तसेच नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना धीर दिला.

यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, शहराध्यक्ष दत्ता निकम, येवला बाजार समितीचे माजी सभापती किसनकाका धनगे, नगरसेवक गोटू मांजरे, मकरंद सोनवणे, सचिन कळमकर, भागीनाथ पगारे, बाळासाहेब काळे, अरुण काळे, अशोक काळे, संतोष खैरनार, नितीन गायकवाड, यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

येवला शहर परिसरात अवकाळी पाऊस आणि वादळामुळे काही घरांचे नुकसान झाले. तसेच अनेक कांदा चाळी, सोलर प्लेट यासह विविध ठिकाणी नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यात येईल असे त्यांनी आश्वस्त केले. तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ज्या घरांचे नुकसान झाले आहे. त्याठिकाणी तातडीने दुरुस्तीची कामे करून त्यांची निवासाची व्यवस्था करण्याच्या सूचना माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिल्या.

Advertisement

दरम्यान देवळाणे येथे आलेल्या वादळी वाऱ्यामुळे जाधव कुटुंब यांच्या घराचे छत कोसळून दोन वृद्ध महिला व एक लहान मुलगा गंभीर जखमी झाला असून जखमींवर अंदरसुल येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत 

या घटनेची माहिती घेत मंत्री छगन भुजबळ यांनी व्हिडिओ कॉल च्या माध्यमातून जखमींची विचारपूस केली आहे. या सर्व जखमींना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून जखमींच्या उपचाराचा खर्च व घरांची दुरुस्ती करून देण्याचे आश्वासन दिले.

रुग्णालयात जखमींची घेतली भेट

वादळी वाऱ्यामुळे जाधव कुटुंब यांच्या घराचे छत कोसळून दोन वृद्ध महिला व एक लहान मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर अंदरसुल येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. माजी खासदार समीर भुजबळ यांनी रुग्णालयात जाऊन जखमीची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली. तसेच यावेळी डॉक्टरांची चर्चा केली.

Comments

No comments yet.