नाशिक (प्रतिनिधी), २२ मे २०२६ - नाशिक शहरातील टीसीएस या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये कामाच्या ठिकाणी महिलांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न आणि धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी नाशिक शहर पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (SIT) पहिली मोठी कायदेशीर कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपींविरुद्ध तब्बल १५०० पानांचे मूळ दोषारोपपत्र (Charge Sheet) नाशिकरोड येथील मा. अतिरिक्त सत्र व विशेष न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. हा संपूर्ण गुन्हा संशयितांनी संघटितपणे आणि फौजदारी पात्र कट रचून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
दोन पोलीस ठाण्यांत एकूण ९ गुन्हे दाखल
या संवेदनशील प्रकरणात पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून नाशिक शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात १ आणि मुंबईनाका पोलीस ठाण्यात ८ असे एकूण ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्ह्याचे गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये याच्या तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) गठीत करण्यात आले होते.
'या' चार मुख्य आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल:
देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यातील गुन्हा रजि.नं. १५६/२६ अन्वये पोलिसांनी खालील आरोपींविरुद्ध न्यायालयात सबळ पुराव्यांसह चार्जशिट दाखल केली आहे: १) दानिश इजाज शेख २) तौसिफ बिलाल अत्तार ३) निदा एजाज खान
४) मतीन माजीद पटेल
लागू करण्यात आलेली कडक कलमे:
आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६१ (२) [गुन्हेगारी कट], ६४, ६८, ६९ [लैंगिक अत्याचार], ४६, ७५, ३९C(४), २९९, २३८, २४९, ३(५) यासह अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ (Atrocities Act) चे कलम ३(१)(w)(i), ३(१)(w)(ii), ३(२)(va), ३(२)(v), ३(१)(s), आणि ३(१)(k) अन्वये गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरावे सादर केले आहेत.
तपासात निष्पन्न झालेले ५ मुख्य पुरावे:
विशेष तपास पथकाने गोळा केलेले पुरावे आरोपींची कोंडी करणारे ठरले आहेत:
पुरवणी दोषारोपपत्र दाखल होणार; जामीन अर्ज फेटाळले
पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, न्यायालयात मुख्य दोषारोपपत्र दाखल झाले असले, तरी या प्रकरणाचा तपास पूर्णपणे थांबलेला नाही. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९३ (९) प्रमाणे पुढील तपास सुरूच राहणार असून, अधिकचे पुरावे प्राप्त होताच न्यायालयात 'पुरवणी दोषारोपपत्र' (Supplementary Charge Sheet) दाखल केले जाईल.
दरम्यान, मुंबईनाका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या उर्वरित ८ गुन्ह्यांचा तपास अंतिम टप्प्यात असून विहित मुदतीत तेथेही चार्जशिट दाखल केली जाईल. या प्रकरणातील सर्व आरोपींचे जामीन अर्ज न्यायालयाने आधीच फेटाळले असून सर्व संशयित सध्या कारागृहात आहेत.