स्क्रीन फुटण्याची चिंता मिटली... मिलिटरी स्टँडर्ड असलेला स्वस्त स्मार्टफोन आला... असा आहे हा तगडा फोन...

Share:
Main Image
Last updated: 24-May-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २४ मे - भारतीय मोबाईल जगतात परवडणाऱ्या किमतीत अत्याधुनिक तंत्रज्ञान आणण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या 'आयटेल' (itel) या अग्रगण्य ब्रँडने आपला नवा स्मार्टफोन 'आयटेल ए१०० प्रो' (itel A100 Pro) भारतात लाँच केला आहे. उत्कृष्ट डिझाइन, अजोड टिकाऊपणा आणि खिशाला परवडणारी किंमत यांचा उत्तम संगम या फोनमध्ये पाहायला मिळतो. जागतिक स्तरावर मेमरीच्या किमती वाढलेल्या असतानाही, कंपनीने हा प्रिमियम डिझाइन असलेला फोन अवघ्या ८,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध करून दिला आहे.

मिलिटरी ग्रेड मजबूती आणि १०० दिवसांची वॉरंटी

या स्मार्टफोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याला 'MIL-STD-810H' हे मिलिटरी ग्रेड प्रमाणपत्र मिळाले आहे, म्हणजेच हा फोन अत्यंत मजबूत आणि दणकट आहे. याशिवाय, आयटेल कंपनी ग्राहकांना खरेदीनंतर पहिल्या १०० दिवसांच्या आत 'मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट'ची (स्क्रीन बदलून देण्याची) विशेष सुविधा देत आहे. नेटवर्क नसलेल्या दुर्गम भागातही कनेक्टिव्हिटी राखण्यासाठी यात 'अल्ट्रालिंक' तंत्रज्ञान देण्यात आले आहे.

कडक फीचर्स आणि दमदार परफॉर्मन्स:

डिस्प्ले आणि ऑडिओ: फोनमध्ये ६.६ इंचाचा ९० हर्ट्झ (90Hz) एचडी+ डिस्प्ले असून, याला डीटीएस (DTS) समर्थित साउंड तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे.

बॅटरी आणि चार्जिंग: दिवसभर अखंड वापरासाठी ५,००० mAh ची मोठी बॅटरी आणि १० वॅटचा चार्जर यात मिळतो.

Advertisement

रॅम आणि मेमरी: हा फोन ३ जीबी रॅम (प्लस ५* जीबी व्हर्च्युअल रॅम) आणि ६४ जीबी रॉम (स्टोरेज) सह येतो.

कॅमेरा आणि प्रोसेसर: फोटोग्राफीसाठी ८ मेगापिक्सल्सचा प्रगत रिअर कॅमेरा आहे. तसेच, वेगवान कामगिरीसाठी यात 'ऑक्टा-कोर युनिसॉक टी७१००' प्रोसेसर आणि लेटेस्ट 'अँड्रॉइड १५ गो' ऑपरेटिंग सिस्टीम दिली आहे.

इतर वैशिष्ट्ये: टीव्ही, एसी नियंत्रित करण्यासाठी 'आयआर ब्लास्टर', सुरक्षिततेसाठी साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक सुविधा आहे. हा फोन कॉमेट ऑरेंज, क्लाउड व्हाईट आणि ब्लॅक अशा तीन आकर्षक रंगांत उपलब्ध आहे.

"आयटेल हा १० हजारांच्या आतील सर्वात विश्वासार्ह ब्रँड"

लाँचिंगप्रसंगी आयटेल इंडियाचे सीईओ अरिजित तालापात्रा म्हणाले,

"लाखो भारतीयांसाठी टिकाऊ आणि परवडणारी उत्पादने तयार करणे हाच आमचा वारसा आहे. 'A100 Pro' ची मजबूत मिलिटरी ग्रेड रचना आणि आकर्षक रंग भारतीय सांस्कृतिक वैविध्याचा सन्मान करतात. नुकताच जाहीर झालेला 'सीएमआर ड्युरॅबिलिटी इंडेक्स' हेच सिद्ध करतो की, १० हजारांच्या बजेटमध्ये आयटेल हा देशातील सर्वाधिक टिकाऊ आणि विश्वासार्ह ब्रँड आहे."

सायबर मीडिया रिसर्च (CMR) च्या ताज्या अहवालानुसार, ८१% ग्राहकांनी आयटेलला मजबूतीशी जोडले आहे, तर ८५% ग्राहकांनी याला 'व्हॅल्यू फॉर मनी' (पैशांचे पूर्ण मूल्य देणारा) ब्रँड मानले आहे. १५ कोटींहून अधिक ग्राहक असलेल्या आयटेलची देशात १.३ लाखांहून अधिक रिटेल आउटलेट्स आणि १००० पेक्षा जास्त सर्व्हिस सेंटर्स आहेत.

Comments

No comments yet.