नाशिक (प्रतिनिधी) दि. १० डिसेंबर - वाहन पासिंग क्षमता वाढवून मशीन मधील तांत्रिक त्रुटी तातडीने दूर करणे व पासिंग प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे यासह विविध प्रश्नांबाबत नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने नाशिकचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. मुख्यत: पासिंग प्रक्रियेत होणारी लुट थांबविण्यात यावी अशी प्रमुख मागणी यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष पी.एम.सैनी, चेअरमन राजेंद्र फड ,सचिव बजरंग शर्मा,समस्या कमिटी चेअरमन महेंद्र राजपूत,उपाध्यक्ष शंकर धनवडे,सदाशिव पवार,तेजपाल सोडा,सतीश कलंत्री, संजू तोडी,भगवान कटीरा,गजानन सोसे,कृष्ण बेनिवाल,संभाजी जाधव,अशोक पवार,मोहन सिंग, सुरेश आहेर,सजन सिंग,दलबीर परधान,महावीर शर्मा, विजय बोऱ्हाडे,प्रवीण नागरे, गिरीश जोंधळे यासह पदाधिकारी उपस्थित होते. नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नवीन वाहन पासिंग मशीन द्वारे प्रक्रियेसाठी नव्याने स्थापित करण्यात आलेल्या मशीनरीमधून तपासणी करताना अनेक तांत्रिक त्रुटी स्पष्ट होत असून, त्याचा थेट फटका वाहतूक व्यवसायिकांना बसत आहे. पासिंग मशीनची क्षमता वाढउन किरकोळ तांत्रिक दोष दाखवल्यानंतर गाडी पासिंगमध्ये रिजेक्ट होत असून,अशा वाहनांना पुन्हा पासिंग मिळण्यासाठी तीन ते चार दिवस अडकवून ठेवले जात आहे. हे असताना त्या वाहनांसाठी पुन्हा स्वतंत्र फी आकारण्यात येत असल्याने वाहतूकदारांवर अन्याय होत आहे. नवीन यंत्रणेमुळे अपेक्षित गतीने तपासणी होण्याऐवजी आठ-आठ दिवस वाहन थांबून राहते ज्यामुळे त्याचे ऑपरेशन थांबते आणि माल वाहतूक तसेच आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याचे म्हटले आहे. नाशिक जिल्ह्याचे क्षेत्रफळ व वाहन संख्या जास्त आहे म्हणून पासिंग साठी मर्यादा वाढउन टोकन वेळेवर मिळावे यामुळे विशेष