टाटा मोटर्सकडून नवी अल्ट्रोज लाँच... हे तंत्रज्ञान असलेली देशातील पहिली प्रीमियम हॅचबॅक...

Share:
Main Image
Last updated: 17-May-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १७ मे - भारतातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्सने (TMPV) आज आपल्या लोकप्रिय प्रीमियम हॅचबॅक 'अल्ट्रोज' (Altroz) मध्ये क्रांतिकारी बदल करत तिचे 'आयसीएनजी एएमटी' मॉडेल लाँच केले आहे. सीएनजी पॉवरट्रेनसह ऑटोमॅटिक (AMT) ट्रान्समिशन असलेली ही भारतातील पहिली आणि एकमेव प्रीमियम हॅचबॅक ठरली आहे. या नवीन मॉडेलमुळे ग्राहकांना आता सीएनजीची आर्थिक बचत आणि ऑटोमॅटिक ड्रायव्हिंगची सुखद सुविधा एकाच वेळी मिळणार आहे.

विविध व्हेरिएंट्स आणि किमती (दिल्ली एक्स-शोरूम):
अल्ट्रोज आयसीएनजी एएमटी ही श्रेणी ग्राहकांच्या गरजेनुसार पाच व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे:
प्युअर (Pure): ८,६९,९९० रुपये
प्युअर एस (Pure S): ८,९९,९९० रुपये
क्रिएटिव्ह (Creative): ९,५९,९९० रुपये
क्रिएटिव्ह एस (Creative S): ९,८१,९९० रुपये
अकॉम्पलीश एस (Accomplish S): १०,७६,९९० रुपये

दमदार परफॉर्मन्स आणि प्रगत तंत्रज्ञान
इंजिन: १.२ लिटर रेवोट्रॉन आयसीएनजी इंजिनसह ही कार ७३.५ पीएस शक्ती आणि १०३ एनएम टॉर्क निर्माण करते.
ट्विन-सिलेंडर तंत्रज्ञान: टाटाच्या पेटंट असलेल्या ट्विन-सिलेंडर तंत्रज्ञानामुळे सीएनजी असूनही या कारमध्ये २१० लिटरची बूट स्पेस (डिकी) मिळते.
डायरेक्ट स्टार्ट इन सीएनजी: ही कार थेट सीएनजी मोडवर सुरू होऊ शकते, जे या सेगमेंटमधील पहिलेच फिचर आहे.

Advertisement

प्रीमियम डिझाइन आणि अद्ययावत फीचर्स
कारच्या अंतर्गत भागात 'एक्झिक्युटिव्ह लाउंज स्टाईल' रिअर सीट्स, सॉफ्ट-टच डॅशबोर्ड आणि हार्मनची २६.०३ सेमीची ट्विन डिजिटल इन्फोटेनमेंट स्क्रीन देण्यात आली आहे. बाह्य भागात इन्फिनिटी कनेक्टेड एलईडी टेल लॅम्प्स आणि फ्लश डोअर हँडल्समुळे कारला अधिक प्रिमियम लूक मिळाला आहे.

सुरक्षेमध्ये ५-स्टार मानांकन
अल्ट्रोज ही भारतातील सर्वात सुरक्षित हॅचबॅक असून तिने पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी अशा तिन्ही प्रकारांत 'भारत एनसीएपी'मध्ये ५-स्टार रेटिंग मिळवले आहे. यात ६ एअरबॅग्ज, ३६०-डिग्री एचडी कॅमेरा, ईएसपी आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम यांसारखी प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत.

"सीएनजी हा देशातील सर्वात वेगाने वाढणारा इंधन पर्याय आहे. अल्ट्रोज आयसीएनजी एएमटीच्या माध्यमातून आम्ही सुरक्षिततेशी तडजोड न करता कार्यक्षमता आणि ड्रायव्हिंगमधील सहजता यांचा योग्य समतोल साधला आहे," असे मत टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीचे चीफ कमर्शियल ऑफिसर विवेक श्रीवत्स यांनी व्यक्त केले.

Comments

No comments yet.