नाशिकचा 'बुमराह' कोण? जिल्ह्यात प्रथमच सर्वात वेगवान गोलंदाजाचा शोध... या तारखेला संधी...

Share:
Main Image
Last updated: 15-May-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १५ मे - भारतीय क्रिकेटला जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांसारखे वेगवान गोलंदाज मिळाल्यानंतर आता नाशिकमधूनही असाच 'रॉकेट' वेगाचा गोलंदाज शोधण्यासाठी नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनने (NDCA) पुढाकार घेतला आहे. नाशिकमध्ये प्रथमच 'फास्टेस्ट बॉलर हंट' (Fastest Bowler Hunt) या विशेष गुणवत्ता शोध मोहिमेचे आयोजन २८ मे रोजी करण्यात आले आहे.

रडार स्पीड गनने मोजला जाणार वेग

नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित या मोहिमेत व्यावसायिक पद्धतीने गोलंदाजांच्या वेगाची चाचणी घेतली जाईल. यासाठी खास 'रडार स्पीड गन'चा वापर करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, मुलांच्या बरोबरीने उदयोन्मुख महिला क्रिकेटपटूंनाही आपली ताकद आजमावण्याची ही मोठी संधी आहे.

बक्षिसांची लयलूट आणि शिष्यवृत्ती

या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसे आणि पदके दिली जाणार आहेत:

खुला गट (३० वर्षांपर्यंत): विजेता - ₹५,००० | उपविजेता - ₹३,०००

१६ वर्षांखालील गट: विजेता - ₹३,००० | उपविजेता - ₹२,०००

याव्यतिरिक्त पात्र खेळाडूंना शिष्यवृत्तीची देखील सुवर्णसंधी मिळणार आहे.

सहभागासाठी अटी आणि नोंदणी:

Advertisement

वयोगट: १३ वर्षे पूर्ण ते ३० वर्षे वयोगटातील गोलंदाज पात्र असतील.

१६ वर्षांखालील: जन्म १ सप्टेंबर २०११ ते ३१ ऑगस्ट २०१३ दरम्यान असावा.

३० वर्षांखालील: जन्म १ जानेवारी १९९६ नंतर झालेला असावा.

नोंदणी शुल्क: केवळ ९९ रुपये.

नोंदणी लिंक: https://forms.gle/G9C9Esy5WZk63FUQA

कधी आणि कोठे?

दिनांक: गुरुवार, २८ मे २०२६

वेळ: सकाळी ८ वाजल्यापासून

ठिकाण: क्रीडक सेंटर ऑफ क्रिकेट एक्सलन्स, मखमालबाद, नाशिक.

अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ८००७३००३६८, ९३७००११६७६ किंवा ८८६२००३४७८ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी समीर रकटे यांनी केले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.