नाशिकमध्ये प्रवासादरम्यान तरुणींचा विनयभंग... रॅपिडो आणि रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हे दाखल...

Share:
Main Image
Last updated: 13-May-2026

नाशिक, (विशेष प्रतिनिधी) १३ मे - शहरात प्रवासी वाहनातून प्रवास करणे महिला आणि मुलींसाठी असुरक्षित ठरत असल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांत रॅपिडो राईडर आणि एका रिक्षाचालकाने तरुणींशी अश्लील वर्तन केल्याच्या घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

रॅपिडो चालकाचे मैत्रीण आणि तरुणीला धमकावणे

पहिली घटना म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. आरटीओ कॉर्नर भागातील एक तरुणी शनिवारी (दि. ९) मेरी-रासबिहारी लिंक रोडवरील आपल्या मैत्रिणीकडे गेली होती. परतीच्या प्रवासासाठी मैत्रिणीने तिला रॅपिडो (Rapido) अ‍ॅपवरून दुचाकी बुक करून दिली.

विनयभंग आणि पाठलाग: दुचाकीवर प्रवास करत असताना संशयित चालक सचिन साळुंखे याने तरुणीचा विनयभंग केला.

व्हॉट्सॲपवर त्रास: एवढ्यावरच न थांबता त्याने पीडितेच्या व्हॉट्सॲपवर अश्लील मेसेज पाठवून त्रास दिला.

Advertisement

शिवीगाळ व दमदाटी: पीडितेने ही बाब मैत्रिणीला सांगितल्यानंतर, मैत्रिणीने चालकाकडे विचारणा केली असता त्याने तिलाही फोनवर शिवीगाळ व दमदाटी केली. याप्रकरणी म्हसरूळ पोलिसात गुन्हा दाखल झाला असून हवालदार राजेश जगताप तपास करत आहेत.

सिडकोत रिक्षाचालकाची दादागिरी आणि विनयभंग

दुसरी घटना सिडकोतील त्रिमूर्ती चौक भागात मंगळवारी (दि. १२) दुपारी घडली. शिकवणीसाठी (क्लास) जाणाऱ्या एका मुलीचा रिक्षाचालकाने विनयभंग केला.

पैशांची मागणी व वाद: पीडित मुलगी रमेश सोमनाथ पाटणकर याच्या रिक्षामधून (एमएच १५ इएच १४२०) प्रवास करत होती. रिक्षाचालकाने प्रवाशांसाठी गाडी थांबवल्याने मुलीने त्याला 'क्लासला सोडा नाहीतर पैसे परत द्या' अशी विनवणी केली.

धमकावून मोबाईल फेकला: यामुळे संतप्त झालेल्या चालकाने 'स्पेशल' सोडण्यासाठी ५०० रुपयांची मागणी करत मुलीला शिवीगाळ केली. यावेळी झालेल्या झटापटीत त्याने विनयभंग करून तिचा मोबाईल हिसकावून फेकून दिला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हवालदार महाजन पुढील तपास करत आहेत.

Comments

No comments yet.