कुंभमेळ्यात घाटावरच मिळणार उपचार... खासगी रुग्णालयांचे १२ हजार बेड राहणार ‘रिझर्व्ह’... असा आहे आरोग्याचा प्लॅन...

Share:
Main Image
Last updated: 11-May-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ११ मे - सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांच्या आरोग्यासाठी व्यापक यंत्रणा उभारण्यात येणार आहे. कुंभमेळा प्राधिकरणाने तयार केलेल्या आराखड्यानुसार, नाशिकमधील खाटांची क्षमता वाढविण्यासोबतच घाटांवर तात्पुरते अतिदक्षता कक्ष (ICU) आणि 'रिले सिस्टीम'वर आधारित रुग्णवाहिकांचे जाळे पसरवण्यात येणार आहे.

नाशिक शहरात आरोग्य सज्जता
खाट क्षमता: नाशिक शहरातील सरकारी खाटांची संख्या १ हजार ३०५ वरून १ हजार ९४५ पर्यंत नेली जाणार आहे, ज्यात ६४० अतिरिक्त तात्पुरत्या खाटांचा समावेश असेल.
विशेष रुग्णालये: तपोवन येथे १०० खाटांचे आणि नांदूर (साधुग्राम) येथे १० खाटांचे विशेष रुग्णालय उभारले जाणार आहे.
घाटांवर सुविधा: शहरातील सर्व १३ घाटांच्या दोन्ही बाजूंना तात्पुरते 'आयसीयू' कक्ष असतील. तसेच २१ ठिकाणी ओपीडी सेवा आणि १९ ठिकाणी वैद्यकीय युनिट्स कार्यरत राहतील.
रुग्णवाहिका: २५ नवीन आणि ७३ भाडेतत्त्वावरील रुग्णवाहिका 'रिले सिस्टीम'द्वारे तैनात केल्या जातील.

त्र्यंबकेश्वरमध्ये ४०० खाटांची नवी रुग्णालये
वाढीव क्षमता: त्र्यंबकेश्वरमध्ये सध्याची ५० खाटांची क्षमता १२० पर्यंत वाढवून त्यामध्ये २७ आयसीयू खाटांची सोय केली जाणार आहे.
नवीन प्रस्ताव: ४०० खाटांच्या क्षमतेची चार नवीन रुग्णालये प्रस्तावित असून, कुंभमेळ्यादरम्यान ३ महिन्यांसाठी २५ तात्पुरती रुग्णालये सुरू केली जातील.
पर्वणी काळात विशेष सज्जता: पर्वणीच्या दिवसांत घाटांवर तात्पुरते अतिदक्षता कक्ष कार्यान्वित राहतील.

Advertisement

खासगी रुग्णालयांचा सहभाग
नाशिकमधील ६२१ खासगी रुग्णालयातील १२ हजार ८०२ खाटा आणि पाच वैद्यकीय महाविद्यालयांतील १ हजार २७५ खाटा 'रिझर्व्ह क्षमता' (Backup) म्हणून वापरल्या जातील. यामुळे भाविकांसह स्थानिक नागरिकांनाही अखंडित सेवा मिळेल.

"प्रत्येक घाट, पार्किंग आणि साधुग्राम येथे आरोग्यसेवा उपलब्ध ठेवणे हे आमच्या नियोजनाचे केंद्र आहे," असे प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांनी स्पष्ट केले. तर, गर्दीच्या दिवसातही प्रभावी वैद्यकीय मदत मिळावी यासाठी समन्वयित नियोजन सुरू असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश शिंपी यांनी सांगितले.

?s=20

Comments

No comments yet.