पांढऱ्या काकडीला दिला चक्क 'हिरवा रंग'... रेल्वे स्टेशनवरील धक्कादायक प्रकार... ९ महिलांना अटक...

Share:
Main Image
Last updated: 11-May-2026

नवी दिल्ली, (प्रतिनिधी) ११ मे - रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याशी खेळणारा एक अत्यंत संतापजनक प्रकार बिहारमधील कटिहार रेल्वे स्थानकावर उघडकीस आला आहे. स्थानकावर पांढरी काकडी (खिरा) विकणाऱ्या काही महिला या काकड्यांना चक्क कृत्रिम हिरवा रंग लावत असताना रंगेहाथ पकडल्या गेल्या आहेत. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) तातडीने कारवाई करत नऊ महिलांना अटक केली आहे.

​फलाटावरच सुरू होता 'रंगाचा खेळ'

​मिळालेल्या माहितीनुसार, या महिला स्थानकावर पांढऱ्या काकड्या विकण्यासाठी बसल्या होत्या. मात्र, पांढऱ्या काकडीला ग्राहक फारशी पसंती देत नाहीत, हे ओळखून त्यांनी या काकड्या ताज्या दिसाव्यात यासाठी एक घातक युक्ती शोधली. फलाटावर बसूनच या महिलांनी एका भांड्यात हानिकारक कृत्रिम हिरवा रंग तयार केला होता. त्यात पांढऱ्या काकड्या बुडवून त्या हुबेहूब ताज्या आणि हिरव्यागार दिसतील, अशा तयार केल्या जात होत्या.

​प्रवाशांच्या आरोग्यास मोठा धोका

Advertisement

​काकडीला दिलेला हा हिरवा रंग अत्यंत निकृष्ट दर्जाचा आणि रासायनिक होता. अशा रंगात बुडवलेल्या काकड्या खाल्ल्याने प्रवाशांना विषबाधा होण्याचा किंवा पोटाचे गंभीर विकार जडण्याचा मोठा धोका होता. प्रवाशांनी गाईड म्हणून किंवा ताजी फळे म्हणून घेतलेल्या या काकड्या प्रत्यक्षात 'स्लो पॉयझन' ठरत होत्या.

​व्हिडिओ व्हायरल अन् कारवाई

​हा प्रकार स्थानकावरील एका जागरूक नागरिकाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरल्यानंतर रेल्वे प्रशासनाचे धाबे दणाणले. रेल्वे सुरक्षा दलाने तातडीने फलाटावर धाव घेत नऊ महिलांना या उद्योगात गुंतलेले असताना ताब्यात घेतले.

​रेल्वे स्थानकावर उघड्यावर विकले जाणारे अन्नपदार्थ किंवा फळे किती धोकादायक असू शकतात, हे या घटनेवरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. प्रवाशांनीही काहीही विकत घेताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.