नेक्स्ट जनरेशन पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार या सुविधा... येथे सुरू झाले हे अत्याधुनिक ऑफिस...

Share:
Main Image
Last updated: 09-May-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ९ मे - "पोस्ट विभाग हा केवळ सेवा देणारा विभाग नसून तो भारतीय सांस्कृतिक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. कारगिल युद्धाच्या काळात वीर जवानांचे निरोप कुटुंबीयांपर्यंत पोहोचवणारा पोस्टमन हा मानवी संवेदनांचा खऱ्या अर्थाने वाहक ठरला आहे," असे गौरवपूर्ण उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानक परिसरातील नूतनीकरण करण्यात आलेल्या अत्याधुनिक पोस्ट ऑफिसचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडले. यावेळी आमदार अमित साटम, हारून खान आणि पोस्ट विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

वारसा आणि तंत्रज्ञानाचा संगम

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘वारसा आणि विकास’ या संकल्पनेतून पोस्ट विभागाने कात टाकली आहे. इंटरनेट आणि खासगी कुरिअरच्या स्पर्धेतही पोस्ट विभागाने आधार सेवा, बँकिंग आणि ऑटोमॅटिक पार्सल सेवा स्वीकारून आपले सामर्थ्य सिद्ध केले आहे. मराठी साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यातूनही पोस्टमनचे समाजजीवनातील महत्त्व अधोरेखित झाले आहे.

'जन सेवा कनेक्ट' : २५ हजार केंद्रांचे उद्दिष्ट

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी माहिती दिली की:

अद्ययावत सुविधा: 'नेक्स्ट जनरेशन पोस्ट ऑफिस' अंतर्गत कॅफे, वाय-फाय, आरएफआयडी (RFID) आणि आधार सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

आर्थिक भरारी: पोस्ट बँकेत ४० कोटी खाती उघडली असून, पोस्ट लाईफ इन्शुरन्समध्ये २ लाख कोटींच्या ठेवी जमा आहेत.

Advertisement

विक्रमी महसूल: २०२५-२६ या आर्थिक वर्षात विभागाने २५०० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे.

विस्तार: 'जन सेवा कनेक्ट' उपक्रमांतर्गत देशभरात २५ हजार, तर महाराष्ट्रात २२०० पोस्ट ऑफिस सुरू करण्यात येणार आहेत.

अंधेरी पोस्ट ऑफिसचा नवा चेहरा

१९३२-३३ मध्ये स्थापन झालेल्या अंधेरी आर.एस. पोस्ट ऑफिसचे आता संपूर्ण आधुनिकीकरण करण्यात आले आहे. येथे ग्राहकांसाठी डिजिटल सेवा प्रणाली आणि सुधारित पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. यावेळी ‘जन सेवा कनेक्ट’ उपक्रमावरील विशेष टपाल तिकिटाचे (Special Cover) अनावरणही करण्यात आले.

ठळक वैशिष्ट्ये:

२४ तासांत स्पीड पोस्ट डिलिव्हरीचे उद्दिष्ट.

पोस्टाच्या महसुलात १६ टक्क्यांपर्यंत वाढ.

नेक्स्ट जनरेशन पोस्ट ऑफिसमध्ये मोफत वाय-फाय आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान.

?s=20

Comments

No comments yet.