गर्भवतींसाठी सुरू झाली ही जबरदस्त सेवा... केंद्र सरकारचा पुढाकार... नक्की लाभ घ्या...

Share:
Main Image
Last updated: 09-May-2026

नवी दिल्ली, (विशेष प्रतिनिधी) ९ मे - देशातील माता आणि बाल आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 'जननी' (JANANI - Journey of Antenatal, Natal and Neonatal Integrated Care) या अद्ययावत डिजिटल प्लॅटफॉर्मचा शुभारंभ केला आहे. या उपक्रमामुळे गर्भवती महिला आणि नवजात बालकांच्या आरोग्यावर आता डिजिटल माध्यमाद्वारे बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.

काय आहे 'जननी' प्लॅटफॉर्म?

'जननी' हे एक सेवा-केंद्रित डिजिटल व्यासपीठ आहे. पूर्वीच्या आरसीएच (RCH) पोर्टलची ही प्रगत आवृत्ती असून, याद्वारे महिलांच्या प्रजनन काळातील आरोग्याचा संपूर्ण इतिहास जतन केला जाणार आहे. यात प्रसूतीपूर्व तपासणीपासून ते प्रसूतीनंतरची काळजी आणि बालकांचे लसीकरण अशा प्रत्येक टप्प्याची नोंद घेतली जाईल.

महत्त्वाची वैशिष्ट्ये:

डिजिटल MCH कार्ड: प्रत्येक लाभार्थीला क्यूआर (QR) कोड असलेले डिजिटल 'माता आणि बाल आरोग्य' कार्ड दिले जाईल. यामुळे आरोग्य नोंदी कुठेही आणि कधीही उपलब्ध होतील.

स्वयंचलित अलर्ट: हाय-रिस्क गर्भधारणा असल्यास सिस्टीमद्वारे त्वरित अलर्ट दिले जातील. तसेच लसीकरण आणि तपासणीसाठी मोबाईलवर स्मरणपत्रे (Reminders) पाठवले जातील.

डिजिटल एकत्रीकरण: हे पोर्टल U-WIN, POSHAN आणि आभा (ABHA) सारख्या राष्ट्रीय प्लॅटफॉर्मशी जोडलेले आहे.

युनिक ओळख: नोंदणीसाठी आधार (OTP/बायोमेट्रिक) आणि मोबाईल क्रमांकाचा वापर केला जाणार आहे. यामुळे स्थलांतरित नागरिकांना देशात कुठेही आरोग्य सेवा मिळणे सोपे होईल आणि नोंदींची पुनरावृत्ती टाळता येईल.

Advertisement

आतापर्यंतची कामगिरी:

या उपक्रमाला आधीच मोठा प्रतिसाद मिळाला असून, आतापर्यंत:

१.३४ कोटी एकूण लाभार्थ्यांची नोंदणी.

३० लाखांहून अधिक गर्भवती महिलांची नोंदणी.

३० लाखांहून अधिक डिजिटल MCH कार्ड्सचे वाटप.

१ लाखांहून अधिक बायोमेट्रिक पडताळण्या पूर्ण.

आरोग्य क्षेत्रातील क्रांती:  "डिजिटल सक्षमीकरणाच्या माध्यमातून माता आणि बालमृत्यू दर कमी करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. 'जननी'मुळे दुर्गम भागातील महिलांनाही वेळेवर उपचार आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणे शक्य होणार आहे."

?s=20

Comments

No comments yet.